कन्या शाळेचे मुख्याध्यापक रजेविना पसार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 
 
 
कन्या शाळेचे मुख्याध्यापक रजेविना पसार
लोहारा ता.पाचोरा, ४ मार्च
येथील जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम अहिरे हे नियमित शालेय कामकाजाच्या वेळेत हजर राहत नसल्याचे अनेकदा पालक, केंद्रप्रमुख,शिक्षक समिती सदस्य, पत्रकार यांच्या लक्षात आले परंतु तोंडी सूचना देऊनही अहिरे यांची मुजोरी वाढली आहे, असा आरोप आहे. ३ मार्च रोजी लोहारा-कुर्‍हाड या दोन्ही केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेला व शाळेला कुठलाही रजेचा अर्ज न देता दांडी मारत, केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे यांच्या आदेशाला झुगारून आपण दांडीबहाद्दर असल्याचे पुन्हा शिक्कामोर्तब केले. पण अधिकाराचा वापर करून केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे कारवाई करणार की पांघरूण घालणार यावर प्रशचिन्ह निर्माण होत आहेत.
 
याबाबत असा प्रकार समजताच लगेचच केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे यांनी कन्या शाळेला भेट देऊन हजेरी पुस्तक, कार्यालयाची तपासणी करत मुख्यध्यापक अहिरे कुठलाही अर्ज न देता गैरहजर असल्याचे केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे यांच्या पाहणीत दिसून आले.याबाबत शेरेबुकात नोंद करून मुख्याध्यापक अहिरे यांच्यावर कारवाई करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
 
शिक्षकांची उडाली भंबेरी
३मार्च रोजी कन्या शाळेला स्थानिक नागरिक,शिक्षण समिती सदस्य,पत्रकार यांनी भेट दिली असता मुख्याध्यापक अहिरे हे रजेचा अर्ज न देता गैरहजर असल्याने उपस्थित शिक्षकांची भंबेरी उडाली मात्र हजेरी पुस्तकावर अहिरे यांची स्वाक्षरी नव्हती आणि रजेचा अर्जही आढळून न आल्याने अहिरे यांनी शालेय कामकाज सोडून दांडी मारल्याने त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे केंद्रप्रमुख धुंदाळे यांनी सांगितले.

कारवाई करण्यात येईल
सभेचा निरोप दिला व रजेवर असल्याचे अहिरे यांनी सांगितले मात्र प्रत्यक्षात शाळेत भेट दिल्यावर अहिरे यांचा कुठलाही रजेचा अर्ज नसल्याने वरिष्ठांना (स्वतः केंद्रप्रमुख)खोटे बोलून दिशाभूल करणार्‍या मुख्याध्यापक अहिरे यांच्या दांडी मारण्याच्या प्रकारात तोंडी सूचना देऊनही बदल होत नसल्याने कारवाई करण्यात येईल.
- बाबुराव धुंदाळे, केंद्रप्रमुख

वरिष्ठांकडे मागणी करु
शालेय शिक्षण समितीच्या बैठकीत मुख्याध्यापक अहिरे यांच्या कार्यपध्दतीबाबत सर्व सदस्यांशी चर्चा करून शाळेची शिस्त बिघडवणार्‍या अहिरेवर कारवाई करण्याची वरिष्ठांकडे मागणी करणार आहे.
- जयवंत क्षीरसागर,
अध्यक्ष शालेय शिक्षण समिती

तत्काळ बदली करावी
कन्या शाळा ही लोहारा केंद्रातील डिजिटल शाळा आहे. गुणवत्तेसाठी शिक्षक मेहनत घेत असतांना मुख्यध्यापकच नेहमीच दांडी मारत असतील तर त्यांची तात्काळ बदली करावी.
- अक्षय जैस्वाल, उपसरपंच
 
@@AUTHORINFO_V1@@