‘समय समर्पण’ सर्वात श्रेष्ठडॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे डॉ. अनंत पंढरेंचे प्रतिपादनडॉ. आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कार वितरण सोहळा हर्षोल्हासात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |


‘समय समर्पण’ सर्वात श्रेष्ठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे डॉ. अनंत पंढरेंचे प्रतिपादन,
डॉ. आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कार वितरण सोहळा हर्षोल्हासात


 
 
जळगाव, ४ मार्च
आपल्या आयुष्यातील मौल्यवान वेळ समाजासाठी देणे ही भावना उच्चकोटीची आहे. त्यामुळेच समय समर्पण हे सर्वात श्रेष्ठ कार्य आहे. ज्याला हे समजते, ज्यात असे काम करण्याची शक्ती आणि इच्छा आहे; तोच हे कार्य करू शकतो. हे कार्य मीराताई कुलकर्णी आणि दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने केले आहे. देश बदलण्यासाठी अजून अशा १० लाख कार्यकर्त्यांची गरज आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे सचिव डॉ. अनंत पंढरे यांनी केले.
 
 
केशव स्मृती सेवासंस्था समूह आणि जळगाव जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. अविनाश आचार्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा डॉ. आचार्य ‘अविनाशी पुरस्कार’ वितरण सोहळा रविवारी सायंकाळी बालगंधर्व खुले नाट्यगृहात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
 
 
या सोहळ्यात गेल्या २० वर्षांपासून आसाममध्ये विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण, संस्कार, योगा आणि तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागवण्याचे काम करणार्‍या मीरा रघुनाथ कुलकर्णी यांना व्यक्तिगत स्तरावरील तर संस्थात्मक स्तरावर यवतमाळ येथील पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी काम करणार्‍या दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचा डॉ. आचार्य ‘अविनाशी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. व्यक्तिगत पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे होते. तर संस्थात्मक स्तरावरील पुरस्काराचे स्वरूप १ लाख १ हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे होते.
 
 
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे तर प्रमुख वक्ते म्हणून औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे सचिव डॉ. अनंत पंढरे लाभले होते. व्यासपीठावर केशव स्मृती सेवासंस्था समूहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, विवेकानंद केंद्राच्या आसाम प्रांत संघटक मीरा कुलकर्णी, दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविक भरतदादा अमळकर यांनी केले.
 
 
डॉ. पंढरे पुढे म्हणाले, पूर्वीपेक्षा आज काळ बदलला आहे. ५-२५ वर्षे समाजकार्य केले तर जाहीर सत्कार होतात. सन्मान मिळतो. परंतु, पूर्वी असे नव्हते. तरीही तेव्हा काही लोकांनी समाजासाठी नि:स्वार्थपणे काम केले. त्यांच्यामुळेच आज देश टिकून आहे. या लोकांपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या वाटेवर चालणार्‍यांना शोधून केशव स्मृती प्रतिष्ठानने समाजासमोर आणले. हे कार्य स्तुत्त्य आहे. मीराताई आणि दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाच्या कार्यकर्त्यांना समाजासमोर आणून त्यांचा सत्कार करणे, हा हेतू केशव स्मृती प्रतिष्ठानचा नाही. तर समाजाला भानावर आणण्याचा त्यांचा मूळ हेतू आहे. हा उपक्रम वर्तमानपत्रातील मथळे बदलण्याचा आहे, अशा शब्दात डॉ. पंढरे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन जयश्री जोशी व प्रवीण पाटील यांनी केले. आभार अनिल राव यांनी मानले.
 
@@AUTHORINFO_V1@@