जामनेर न.पा.साठी ६ एप्रिलला मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |

 
जामनेर :
जामनेर नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार १२ मार्चपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत, तर ६ एप्रिल रोजी मतदान होईल. याच्या दुसर्‍या दिवशी ७ रोजी, मतमोजणीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
उमेदवारी अर्ज १२ ते १९ मार्च दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येतील. रविवारी हे काम होणार नाही. दाखल अर्जांची-छाननी २० रोजी, होणार आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत सोमवार, २६ रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आहे. यानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहे.
मतदान ६ एप्रिल रोजी, सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. याच्या दुसर्‍या दिवशी ७ रोजी, सकाळी १० वाजेपासून मतमोजणी केली जाणार आहे. जामनेर सोबतच राज्यातील कणकवली, आजरा, गुहागर, देवरूख, वैजापूर येथेही ६ एप्रिलला मतदान होणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@