जिल्हयातील पशुधन व दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांचे निर्देश
मुद्रा व अन्य विभागाच्या योजनांचीही घेतली माहिती
 


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयातील पशुधनाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणा-या सोयीसुविधांची बळकटी करणे आवश्यक आहे. यासोबतच जिल्हयात दुग्ध क्रांतीसाठी शासकीय व केंद्रीय दुध डेअरींच्या संकलन व्यवस्थेचे नियोजन आवश्यक असून त्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात यावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले आहे.
 
स्थानिक नियोजन भवन येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये मदर डेअरीच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यासोबतच जिल्हाभरातील पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने, तेथील वैद्यकीय व्यवस्था या संदर्भातही महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. मदर डेअरी, शासकीय दुग्ध विकास अधिकारी कार्यालय, रेषीम उद्योग कार्यालय, यासोबतच पतपुरवठा करणारे बँकेचे अधिकारी, मुद्रा बँके योजनेचा आढावा, खासदार निधीचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.
 
 
जिल्हयात सद्या मदर डेअरी या केंद्रीय दुध संकलन व्यवस्थेमार्फत मोठया संख्येने दुध खरेदी केल्या जाते. याशिवाय जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्या अंतर्गत शासकीय दुध संकलनाचे कार्य केले जाते. मदर डेअरीच्या जिल्हयातील आगमनानंतर हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने विविध शासकीय योजनासाठी बँकांव्दारे पतपुरवठा मोठया प्रमाणात सुरु करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात मदर डेअरीव्दारे दुध खरेदीही मोठया संख्येने सुरु होती.
 
 
तथापि, उन्हाळयाच्या दिवसांमध्ये आवश्यक प्रतीचे दुध मिळत नसल्याच्या तक्रारी मदर डेअरीच्या आहेत. तर उत्तम भाव मिळत नसल्याबाबत तसेच दुध आवश्यक प्रतीचे नसल्यास परत करण्याबाबत मदर डेअरीने लवचिक निर्णय घ्यावा, अशी मागणी दुध उत्पादकांनी केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात जिल्हयात उदभवलेल्या परिस्थितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
 
@@AUTHORINFO_V1@@