ही नारायण राणेंची ‘स्वाभिमानी’ लाचारी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |





रिफायनरी प्रश्नावर रामदास कदम यांची टीका

मुंबई : नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी माझ्यावर केलेले आरोप ही ‘स्वाभिमानी’ लाचारी असल्याची बोचरी टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. तसेच, रिफायनरी प्रकल्पाला पर्यावरणमंत्री म्हणून मी परवानगी दिली असेल तर तशी माझी सही असलेला कागद दाखवावा अन्यथा राणेंनी राजकारणातून निवृत्त व्हावे, असे आव्हानही रामदास कदम यांनी दिले.
 
 
 
विधानभवन येथे माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत रामदास कदम यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच रिफायनरी प्रकल्पाला पर्यावरण विषयक मंजुरी दिली असल्याचे आरोप राणे यांनी नुकतेच केले होते. यावर उत्तर देताना कदम म्हणाले की, मंजुरीच्या कागदावर माझी सही असलेला कागद राणे यांनी दाखवावा अन्यथा राजकारणातून संन्यास घ्यावा. राणे यांनी भाजपला खूष करण्यासाठी व मंत्रिपद मिळवण्यासाठीच माझ्यावर असे आरोप केले असल्याचे कदम यावेळी म्हणाले.



मुख्यमंत्र्यांना दोनवेळा पत्रे लिहिली
नारायण राणे यांनी आपल्यावर जरी आरोप केले असले तरी आपण स्वतः या विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन पत्रे लिहिली असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. यातील एका प्रकल्पात आपली रिफायनरी प्रकल्पविरोधी भूमिका आपण स्पष्ट केली असून दुसऱ्या पत्रात आपण कोकणात कोणतेही रासायनिक प्रकल्प आणण्यास विरोध असल्याचे लिहिले आहे. त्यामुळे राणेंचे माझ्यावरील आरोप ही त्यांची स्वाभिमानी लाचारी असून लोकांना आता नारायण राणेंची पत कळली असल्याची टीका रामदास कदम यांनी केली.
@@AUTHORINFO_V1@@