सोशल जगाकडे सुवर्णसंधी म्हणून पाहावे : मुक्ता चैतन्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 
 
 
नाशिक : "येथे काहीतरी "लिहा" असे आपल्याला फेसबुक सांगतो, तेव्हा कोण लेख लिहितो, कोण कविता तर कोण छायाचित्र टाकतो. पण ही फेसबुकची हाक आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते याचा विचार कोणी करत नाही. याबाबतीत सोशल जगाला गांभीर्याने व एक सुवर्णसंधी म्हणून बघण्याची २१ व्या शतकात गरज आहे. याच विषयावर पुस्तक पेठ आयोजित कार्यक्रमात मुक्ता चैतन्य यांनी प्रेक्षकांशी मुक्त संवाद साधला.
 
 
मुक्ताजी मूळच्या पत्रकार आणि काही वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ आधुनिक पद्धतीने साहित्य जोपासण्याचा निर्णय घेतला. मग त्यात ब्लॉग, ऑडियो बुक व नुकताच येऊ घातलेला पॉडकास्ट हा प्रकार आणि पारंपरिक फेसबुकसुद्धा त्यात आलेच. त्यांनी सर्व माध्यम अगदी सहजतेने हाताळली व त्यावर आपला एक वेगळा ठसा उमटवला.
 
 
स्वतःची ओळख करून देताना प्रत्येक सोशल व्यासपीठाची ओळख करून दिली आणि पॉडकास्ट या विषयाचे खोलात विश्‍लेषण केले. ’पॉडकास्ट’मधे मुख्यतः लेखाच्या वाचनाचा ऑडियो व त्याचा प्रसार असे त्याचे रूप. मुक्ताजींचा ‘कनेक्ट’ या लेखाचा पॉडकास्ट स्नोवेल या संस्थेने या प्रकाराच्या सुरुवातीच्या दिवसात केला. मधल्या काळात डेनिएल या परदेशी लेखकाचा सोशल नेटवर्किंगचा कोर्स करण्याची संधी त्यांना मिळाली आणि सोशल ऍनालिस्ट म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्या क्षेत्रात काम करत असताना सोशल प्लॅटफॉर्म्सच्या उपयुक्ततेचे काही किस्से त्यांनी शेअर केले.
 
 
पुण्यातला एक व्हॉटसऍप ग्रुप आहे. ज्यात सहभागी व्हायची किम्मत तब्बल सातशे रुपये आहे पण त्यात कुठलेही कॉपी पेस्ट न करता फक्त स्वतःच्या व्यवसायाकरता त्याचा उपयोग केला जातो. त्यासोबत एक अध्यात्मच्या ग्रुपमध्ये गीतेच्या श्‍लोकांचे ऑडियो स्वरूपातल्या मेसेजेसची देवाणघेवाण होते. त्यांच्या पुस्तकांबद्दल बोलायचं झाल्यास पहिले पुस्तक ’स्ट्रगलर्स’ मध्ये चंदेरी दुनियेत अभिनय क्षेत्रात स्वतःचे नशीब अनुभवायला आलेल्या लोकांपैकी फार थोडे लोक यशस्वी होतात, बाकीच्यांचे काय होते याचे वर्णन या पुस्तकात आहे. टीन एजमध्ये असलेल्या मुलींच्या भावनिक बदलाबद्दल थोडे गांभीर्याने भाष्य केलंय ’तेरा ते तेवीस’ या पुस्तकामध्ये. या विषयाबद्दल बोलताना त्याच वयातल्या मुलांशी बोलण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले. त्यांच्या एवरेस्टच्या शब्दांकनाचा अनुभवसुद्धा त्यांनी सांगितला. स्वसंरक्षणाचा मुद्दा त्यांनी लिखाणात घ्यावा, हेसुद्धा काही उपास्थितांचे म्हणणे होते. या माध्यमाची ताकद ओळखण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय, ही खंत त्यांनी व्यक्त केली आणि ठरवल्यास या क्षेत्रात प्रगतीला बराच वाव आहे, हा आशादायी संदेश देत चर्चेला पूर्णविराम दिला.
 
@@AUTHORINFO_V1@@