७ एप्रिलपासून होणार आयपीएलच्या यंदाच्या सत्राला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |



मुंबई : देशभरातील क्रिकेट प्रेमानं भुरळ घालणाऱ्या इंडियन प्रेमिअर लीगच्या यंदाच्या सत्राला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने यावर शिक्कामोर्तब केला असून ७ तारखेला संध्याकाळी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएलच्या सत्राला सुरुवात होईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

दरम्यान या अगोदर हा कार्यक्रम ६ एप्रिलला घेण्याचा विचार बीसीसीआयकडून केला जात होता. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे या तारखेवर बीसीसीआय शिक्कामोर्तब केला नव्हता. यानंतर काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर विचारविमर्श करून ७ एप्रिल ही अंतिम तारीख जाहीर केली.

दरम्यान या सत्राच्या सुरुवातीचा सामना हा मुंबई इंडीयन नि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये होणार आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ वेळेनंतर चेन्नईचा संघ पुन्हा एकदा आयपीएलमध्ये प्रवेश करत आहे. तसेच १५ कोटी रुपये किमत मोजून चेन्नईने महिंद्रसिंह धोनी याला आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा घेतले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी विजय ठरलेला मुंबई संघ आणि चेन्नईमधील पहिला सामना कोण जिंकणार याची उत्सुकता आतापासूनच सर्वांना लागली आहे.
@@AUTHORINFO_V1@@