उद्योगमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार : भास्कर जाधव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |




मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार येथील ग्रीन रिफायनरीबाबत दि. १ मार्च रोजी दिलेली माहिती व आज विधानसभेत निवेदन करताना दिलेली माहिती यात मोठी विसंगती असून याविरोधात आपण सुभाष देसाई यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली. यामुळे आता रिफायनरी वादात राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.


विधानभवन येथे पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, दि. १ मार्च रोजी रिफायनरीबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु तो पटलावर न आल्याने त्यावर चर्चा झाली नाही. मात्र, उद्योगमंत्र्यांनी त्यात दिलेले उत्तर हे लबाडीचे होते, असा आरोप जाधव यांनी केला. नाणार परिसरातील ग्रांमपंचायतींचा विरोध, जिल्हा नियोजन बैठकीत घेतलेला विरोधात ठराव, शिवसेनेचे आंदोलन, संघर्ष समितीचे आंदोलन, भूसंपादनाला झालेला विरोध आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट पाहता उद्योगमंत्र्यांनी दि. १ मार्च रोजी लेखी उत्तर देताना रिफायनरीला विरोध नाहीच असे म्हटले आहे तसेच त्यात रिफायनरी कार्यान्वित होण्यासाठी उचित निर्णय घेण्यात येईल असे म्हटले आहे. मात्र, सदर विषय आपल्यावर 'बुमरँग' होतो असल्याचे लक्षात येताच देसाई यांनी आज नियमबाह्य निवेदन केले. या साऱ्या आरोपांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसही शिवसेनेला रिफायनरीबाबतच्या धरसोड वृत्तीवरून लक्ष्य करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@