भुजबळांना खाजगी रूग्णालयात उपचाराची परवानगी मिळावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |




विरोधी पक्षांच्या सदस्यांची विधानपरिषदेत मागणी


मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रकृतीचा मुद्दा सोमवारी विधानपरिषदेत मांडण्यात आला. त्यांना योग्य उपचार मिळत नसून त्याचा पुढील उपचार खाजगी रूग्णालयात करण्यासाठी त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधीपक्षातील अन्य सदस्यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे केली.


आ. कपिल पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीचा मुद्दा सभागृहासमोर मांडला. छगन भुजबळ हे विद्यमान आहेत. त्यांनी प्रकृती ठिक नसतानाही त्यांना जेजे रुग्णालयात तपासणीदरम्यान रांगेत उभे रहावे लागले. त्यांचे रिपोर्ट योग्य नसतानाही डॉक्टर त्यांना तुरूंगात पाठवण्याचा सल्ला देत आहेत, अशी माहिती आ. कपिल पाटील यांनी यावेळी दिली. तसेच याबात प्रशासन काय करत आहे असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला.


प्रशासकीय फेऱ्यात भुजबळांना संपवायचे आहे का - मुंडे

विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील भुजबळ यांना योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप केला. भुजबळ हे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार असूनही तरीही त्यांना रूग्णालयात रांगेत उभे राहावे लागते. त्यांनी इतर मागासवर्गीय समाजासाठी दिलेले योगदान पाहता आणि या समाजाच्या भावनेचा विचार करता त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यायची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. प्रशासकीय फेऱ्यात भुजबळांना संपवायचं आहे का ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.


मनात अढी ठेवून काम करणारे सरकार नाही – चंद्रकांत दादा पाटील

सभागृहाला आश्वत करताना मनात अढी ठेवून काम करणारे हे सरकार नसल्याचे सांगत कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेता येईल असे सभागृह नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी ब केले. दरम्यान, सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भुजबळ यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येईल का याविषयी न्यायालयाला सरकार आणि संबंधित तपास संस्थांनी विचारणा करावी आणि याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असे आदेश दिले.
@@AUTHORINFO_V1@@