टेक्नोसॅव्ही पाळीव प्राणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |

 
 
आजच्या या सोशल मीडियाच्या जगात आपले एखाद्या तरी समाज माध्यमावर खाते हे असतेच. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप तर अगदी सर्रास वापरलं जातं. मात्र त्या शिवाय इंस्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट अशा कितीतरी अॅप्सची नावं आहेत, ज्यांचा आपल्या दररोजच्या आयुष्यात समावेश आपोआपच झाला आहे. हे तर झालं माणसांचं. पण पाळीव प्राण्यांची देखील ट्विटर वर खाती आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का?
 
 
 
 
या पाळीव प्राणांमध्ये श्वानांचा पहिला नंबर आहे. हिंदी भाषेतील छोट्या पडद्यावरची लाडकी जोडी 'गुरमीत आणि देबीना' चौधरी यांचा पहिला नंबर लागतो. त्यांचा पाळीव कुत्रा 'डेक्स्टर' याच्या ट्विटर खात्यावर त्यांचे अनेक फोटो आहेत. गंमत म्हणजे डेक्स्टरचे ८३७ फॉलेअर्स आहेत, आणि त्याने आता पर्यंत ८४ ट्वीट्स केले आहेत.
 
 
 
 
 
केवळ डेक्स्टरच नाही तर अशी अनेक ट्विटर खाती आहेत, ज्यामध्ये पाळीव प्राणी आपले मनोगर व्यक्त करताना, आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त करतना दिसतील. आहे ना हे मजेशीर? कुकी फ्रँकेल नावाचं असंच एका पाळीव कुत्र्याचं ट्विटर खातं आहे. ज्यामध्ये अनेक सुंदर सुंदर फोटो आहेत.
 
 
 
 
यामध्ये प्रियंका चोप्राच्या लाडक्या डायनाचा देखील समावेश आहे. डायरीज ऑफ डायना या नावाने तिचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, ज्यामध्ये डायना आणि प्रियंकाचे अनेक फोटोज आहेत. डायनाचे ५५ हजार इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. माणसांचे देखील एवढे फॉलोअर्स नसतील जितके डायनाचे आहेत.
अभिनेत्री आणि गायिका सोफी चौधरी हिच्या टियाचं देखील इंस्टाग्रामवर भरपूर कौतुक होतं. टियाचे दीड हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. हे सगळं पाहून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही.
 
 
 
 
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री किश्वर मर्चेंट हिच्या बटुकनाथचे देखील ३५ हजारांहून अधिक इंस्टाफॉलोअर्स आहेत. केवळ अभिनेतेच नाही तर त्यांचे पाळीव प्राणी देखील त्यांच्या इतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षा मोठे सेलिब्रिटी झाले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
 
 
 
 
एकूण काय तर मुके प्राणी आता मुके राहीले नाहीत.. त्यांच्या भावनांना वाचा फोडणारे हे सोशल मीडिया अकाउंट्स बघितले की तेच आपल्याशी गप्पा मारतायेत असं वाटतं नाही का?
@@AUTHORINFO_V1@@