सीबीएसईच्या बोर्ड परिक्षांना आजपासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |


मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसईच्या बोर्ड परिक्षांना आजपासून देशभरात सुरुवात होत आहेत. इ. १० वी आणि १२ वी या दोन्ही इयत्तांची परीक्षा एकाच वेळी सुरु होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये सध्या तणावाचा वातावरण पाहायला मिळत आहे.

आज सकाळी १०.३० वाजल्यापासून परीक्षेला सुरुवात झाली आहे. १२ वी विद्यार्थांचा आज इंग्रजीचा विषयाचा पेपर असून १० वीच्या विद्यार्थांचा त्यांचा विभागानुसार अभ्यासक्रमावर आधारित विषयाचा पेपर असणार आहे. १० वीचे विद्यार्थी पहिल्यांदाच बोर्ड परीक्षेला सामोरी जात असल्यामुळे सध्या अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रांबाहेर पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान येत्या १० आणि १३ एप्रिलपर्यंत या परीक्षा सुरु राहणार आहेत. येत्या १० एप्रिलला दहावीच्या तर १३ एप्रिलला बारावीच्या परीक्षा संपणार आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र बोर्डचा विद्यार्थांच्या देखील परीक्षांना सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यातील २१ तारखेला बारावीच्या तर १ मार्चला इ. १० वीचा परीक्षांना संपूर्ण राज्यभर सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यभर एक वेगळेच वातावरण तयार झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@