भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा फायदा घ्यावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 
अर्ज सादर करण्यासाठी १५  पर्यंत मुदत
 

भंडारा : अनुसूचित जाती व नवबौध्द विदयार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विदयार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द विदयार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत १५ मार्च २०१८  पर्यंत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
 
 
 
या योजनेसाठी विदयार्थ्यांना १०,१२, पदवी, पदवीका परिक्षेमध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विदयार्थ्यांसाठी ही मर्यादा ५०  टक्के असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष, अटी व शर्ती या अर्जासोबत जोडलेल्या आहेत. त्याचे विद्यार्थी व पालकांनी अवलोकन करावे. निकष, अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या विदयार्थ्यांनीच अर्ज भरावेत. 
 
 
 
 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना  https://mahaeschool.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in,https://www. maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ते संकेतस्थळ डाऊनलोड करुन घ्यावा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह तो विदयार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र जोडावे.
 
 
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा येथे समक्ष, टपालाव्दारे, कार्यालयाच्या ईमेल वर १५  मार्च २०१८  पर्यंत अर्ज दाखल करावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन,जिल्हा परिषद चौक, भंडारा येथे संपर्क साधावा.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@