मनपा करवाढ प्रस्तावात भाजपने सुचविली कपात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेकडे ठेवलेल्या करवाढीच्या प्रस्तावाविरोधात होत असलेला जनआक्रोश पाहता भाजपने हा प्रस्ताव फेटाळत ही करवाढ ३३ टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
 
महापौरांनी निवासी ते औद्योगिक मिळकतींसाठी सरसकट १८ टक्क्यांपर्यंत दरवाढीचा ठराव स्वाक्षरी करून नगरसचिव विभागाकडे पाठविला आहे. महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या काळात स्थायी समितीवर पाठविलेल्या मिळकत करवाढीच्या प्रस्तावात सुधारणा करत त्यात जबर वाढ केली होती. निवासी करात ३३ टक्के, अनिवासी करात ६४ तर औद्योगिक करात तब्बल ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ सुचविण्यात आलेली होती. शिवाय, भांडवली मूल्यावर आधारित करवाढीचा आग्रह धरण्यात आला होता.
 
राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा विभागीय कार्यालयांसमोर हल्लाबोल आंदोलन करत या करवाढीचा निषेध नोंदवला. त्याचप्रमाणे या करवाढीविरोधात भाजपविरोधात सर्वपक्षीयांची मोट बांधत आंदोलनाची रूपरेषा आखली जात होती. व्यापारी, उद्योजकांनीही या विरोधात महापौरांची भेट घेत निवेदन दिले. त्यावेळी ही दरवाढ निम्म्यावर आणली जाईल, असे आश्‍वासन महापौरांनी दिले होते. त्यामुळे या निर्णयाचा भाजपला फटका बसून शकतो, ही बाब विचारात घेऊन महापौरांनी सरसकट १८ टक्के दरवाढीला मंजुरी दिली असून त्यानुसार मिळकत कराची आकारणी केली जाणार आहे.
 
अशी असेल दरवाढ
 
सरकारी शिक्षण कर, रोजगार हमी कर, निवासी कर हे राज्य शासनाच्या कायद्यातील तरतुदीनुसार लागू राहतील. आगनिवारण कर व वृक्षसंवर्धन करात बदल केलेला नाही. या दरवाढीमुळे महापालिकेला वार्षिक १२ कोटी ६० लाख रुपये इतके उत्पन्न अपेक्षित आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@