१६ वर्षीय मानुची 'सुवर्ण' कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |


 
ग्वादालाहारा (मेक्सिको) : येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनच्या वर्ल्डकप सीरिजच्या कालच्या तिसऱ्या दिवशी देखील भारताच्या खात्यात आणखी सुवर्णपदक जमा झाले आहे. भारताची मानू भाकेर या १६ वर्षीय मुलीने महिलांच्या १० मी. एअर पिस्तुल गटामध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मानूने मेक्सिकोच्या अॅलेझॅन्डरा जॅवल्न हिचा पराभव करून स्पर्धेतील सुवर्ण पदक आपल्या नावावर केले.
 
 
तसेच पुरुषांच्या एअर रायफेल गटामध्ये भारताच्या रवी कुमार आणि दीपक कुमार या दोघांनी काल प्रत्येकी एक-एक अशा दोन कांस्य पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात एकूण २ सुवर्ण आणि ३ कांस्यपदक जमा झाले आहेत. दरम्यान स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारताच्या शाहजाद रिझवी याने भारताला एका सुवर्ण पदकाची कमाई करून दिली होती. तसेच मेहुली घोष हिने एक कांस्य पदक पटकावले होते.

 
 

स्पर्धेच्या सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी अत्यंत उत्तम कामगिरी करून आतापर्यंत स्पर्धेत भारताला अव्वलस्थानी ठेवले आहे. भारतीय खेळांच्या उत्तम कामगिरीमुळे दोन सुवर्ण पदकांसह भारत हा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
@@AUTHORINFO_V1@@