शहादा-पिंगाण्याला जोडणारा पुल म्हणजे एकोपा दर्शवणारा पुल-ना .रावल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |
 

शहादा-पिंगाण्याला जोडणारा पुल म्हणजे एकोपा दर्शवणारा पुल

-पालकमंत्री जयकुमार रावल

नंदुरबार दि. 3 - 2006 मध्ये महापुरात मोठ्या प्रमाणात पिंगाणे गाव व शहादे शहराचे मोठे नुकसान झाले होते त्यावेळेस मी शहाद्याचा आमदार होतो त्यामुळेगोमाइ नदीचा पात्रात शहादा व पिंगाण्याला जोडणारा पुल बनविन्याचा संकल्प केला होता आज ते स्वप्न साकार झाले. एका बाजुला ग्रामीण भाग असुन मंदिर आहे तर दुसर्या बाजुस शहराला लागुन मश्जिद आहे म्हणजे शहादा व पिंगाण्याला जोडणारा पुल म्हणजे एकोपा दर्शवणारा पुल आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यानी केले.

 
 

आज ऱोजी पिंगाणे ते कुकडेल गोमाइ नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्वघाटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी आ. उदेसिंग पाडवी होते. याप्रसंगी खा. डॉ . हिनाताइ गावीत, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, उपनगराध्यक्ष रेखाबाइ चौधरी ,जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील , जि प सदस्य अभिजीत पाटील, कार्यकारी अभियंता झेलसिंग पावरा, प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर , तहसीलदार मनोज खैरनार , भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाळे , भाजपा तालुका अध्यक्ष डॉ किशोर पाटील यांचेसह नगरसेवक उपस्थित होते. प्रथम मान्यवरांचा हस्ते कोनशिलेचे अनावरण व फित कापुन पुलाचे विधिवत उद्वघाटन केले.

 
 

पुढे बोलतांना मंत्री जयकुमार रावल यानी हा पुल शहादे तालुक्याचा दृष्टीने महत्वाचा दुवा आहे. सर्वांगीण विकासाला चालना देणारा आहे. शेतकर्यांचा दृस्टीने लाभदायक ठरेल. शहादे शहराला जास्तीत जास्त माझा निधीतुन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहीन नदीचा काठावर चौपाटी साठी पाठपुरावा करेल असे आश्वासन दिले. भविष्यात कलकत्ता ते अहमादाबाद हा भव्य राज्य मार्ग होइल या रस्त्याला शहादे शहर जोडले जाइल एक विकसित शहर होण्यास प्राधान्य मिळेल. भविष्यात महामार्गांचे जाळे शहराला लागुन होतील .

 
 

खासदार हीना गावीत बोलताना म्हणाल्या की शहादा शहर हे जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर आहे. सोनगीर ते शहादा हा महामार्ग होणार आहे या मार्गाने सातपुड्यातील धडगाव सारखे महत्वाचे आदिवासी विकासांची केंद्र म्हणुन धडगाव देखील जोडले जाइल हा महामार्ग लवकर व्हावा म्हणून माझा पाठपुरावा सुरु आहे शहादा तालुक्याचा विकास करणे ही माझी बांधिलकी आहे .

आमदार उदेसिग पाडवी बोलताना गोमाइ नदिवरील हा चौथा पुल आहे स्व. पी. के. अण्णाचा प्रेरणेने पुर्ण केला. 2010 पासुन पुलाचा बांधकामाला परवानगी मिळाली होती या पुलामुळे 5 कि मी चा फेरा वाचणार आहे. ग्रामीण भागाला जोडणारा दुवा ठरणार आहे. पुलाचे उद्वघाटन झाल्याने मी समाधानी आहे . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिनेश खंडेलवाल यांनी केले. कार्यक्रमाला राजकीय सामाजिक कार्यकर्ते पिंगाणे येथील ग्रामस्थ ठेकेदार रविंद्र पाटील अधिक्षक अभियंता चंद्रकांत वाघ उप अभियंता कमलाकर साळुंखे उपस्थित होते.

 
 

नाबार्ड 21 अंतर्गत या रस्त्याचे काम करण्यात आले असुन या पुलाचा बांधकामास 516. 67 लक्ष रुपये खर्च करण्यात आलाया पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उप अभियंता शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Nilesh Subhash Wani,
Bhusawal.
Dist- Jalgaon
Maharashtra
 
@@AUTHORINFO_V1@@