गुणवत्तावाढीच्या टप्प्यानुसार शाळासिद्धीची वाटचाल - डॉ. पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |
 
 
गुणवत्तावाढीच्या टप्प्यानुसार शाळासिद्धीची वाटचाल - डॉ. पाटील
भुसावळ - विद्येचे माहेरघर म्हटल्या गेलेल्या पुणे येथील डेक्कन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भुसावळ येथील द. शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षक डॉ. जगदीश पाटील यांनी शाळासिद्धी कार्यशाळा घेवून तेथील शिक्षकांना शाळासिद्धी संकल्पना, स्वयंमूल्यमापन व बाह्यमूल्यमापन प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. गुणवत्ता यावी व टिकून राहावी यासाठी गुणवत्तावाढीच्या टप्प्यानुसार शाळासिद्धीच्या माध्यमातून सर्वांनाच वाटचाल करावी लागणार असल्याचे प्रतिपादन शाळासिद्धीचे राज्य निर्धारक तथा राज्य प्रशिक्षक डॉ.जगदीश पाटील भुसावळ यांनी पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये केले.
 
 
पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग पुणे ३० या शाळेतील शिक्षकांसाठी आायोजित शाळासिद्धी कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील द.शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षक डॉ. जगदीश पाटील यांनी पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले. प्रारंभी शाळासिद्धी राज्य प्रशिक्षक डॉ. जगदीश पाटील यांचा परिचय महेश जोशी यांनी करून दिला. प्राचार्या तिलोत्तमा रेड्डी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक अर्चना पंच यांनी केले. शाळासिद्धी संकल्पना, स्वयंमूल्यमापन व बाह्यमूल्यमापन याविषयी बोलतांना डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, शंभर टक्के मुले त्या त्या इयत्तेतील अपेक्षेप्रमाणे शिकत असल्यास ती शाळा प्रगत ठरते. त्यामुळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून शंभर टक्के मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. मात्र ज्या शाळांमध्ये जास्त विद्यार्थी संख्या असतांनासुद्धा शाळा प्रगत नसल्या तर त्यांच्यासाठी प्रगत शाळेचा कृती कार्यक्रम आखण्याची नितांत गरज आहे. गुणवत्ता वाढवून प्रत्येक शाळा अ श्रेणीत कशी येईल त्यासाठी शाळासिद्धी माध्यम आहे. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आला. त्यानुसार सर्व शाळा अ श्रेणीत आल्यावर त्या शाळांची दरवर्षी स्वयंमूल्यमापनानंतर बाह्यमूल्यमापनाद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही कारणामुळे शाळा अ श्रेणीपासून वंचित राहू नये आणि शंभर टक्के शाळा अ श्रेणीत आल्याच पाहिजे असा सकारात्मक आग्रह शिक्षण विभागाने धरला आहे. शाळासिद्धी उपक्रमांतर्गत बाह्यमूल्यमापनाची प्रक्रिया प्रस्तावित असून स्वयंमूल्यमापनात अ श्रेणी प्राप्त शाळा मुख्याध्यापकांनी बाह्यमूल्यमापनाला सामोरे जातांना चिंता सोडून चिंतनाच्या माध्यमातून शाळा सुधारणेकडे लक्ष केंद्रीत करावे. बाह्यमूल्यमापनाची तयारी म्हणून सात क्षेत्रनिहाय व ४६ गाभा मानकानिहाय पुराव्यांचे संकलन, मांडणी, सादरीकरण व जतन कसे करायचे याविषयीची सविस्तर माहिती शाळासिद्धीचे राज्य प्रशिक्षक डॉ. जगदीश पाटील यांनी पीपीटीद्वारे कार्यशाळेत दिली. शेवटी शिक्षकांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही डॉ. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रजनी कोलते यांनी तर आभार प्राचार्या तिलोत्तमा रेड्डी यांनी मानले.
 
@@AUTHORINFO_V1@@