त्याग आणि सेवा हे भारताचे आदर्श गुण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |

 

 
 

 
 
 
सुहासराव हिरेमठ यांचे प्रतिपादन
 

मुंबई: त्याग आणि सेवा हे भारताचे आदर्श गुण आहेत, असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे. आपल्या मूळ प्रवृत्तीतील हे गुण कधी शिकवावे लागत नाहीत. गरज असते, ते गुण जागृत करण्याची. या गुणामुळेच एखादी सर्वसामान्य व्यक्तीदेखील संकटाच्या वेळी मोलाचे कार्य करून जाते,’’ असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी उपस्थितांसमोर मांडले. रा. स्व. संघाच्या घाटकोपर विभागातर्फे आज, दि ४ मार्च रोजी राष्ट्रोत्थान सेवा संगमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कुर्ला पूर्व येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंचावर स्वागत समिती अध्यक्ष गणेशकुमार व रा. स्व. संघ घाटकोपर विभाग संघचालक किशोर मोघे उपस्थित होते.

सुहासराव हिरेमठ पुढे म्हणाले की, “आपले कार्य लोकांपर्यंत पोहोचले की त्यांच्याही मनात सेवाभाव जागृत होतो. आपल्याला स्वावलंबी, स्वाभिमानी समाज घडवायचा आहे, ही गोष्ट समाजकार्य करताना लक्षात ठेवणे आवश्यक असते. आज जो सेवा घेणारा आहे तो उद्या सेवा देणारा बनावा, ही आपली जबाबदारी आहे.’’ समाजोपयोगी कार्य करणार्‍या मुंबई पूर्व उपनगरातील स्वयंसेवी संस्था व एकल स्वरूपात सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते यांमध्ये परिचय होऊन सुसंवाद प्रस्थापित व्हावा या हेतूने राष्ट्रोत्थान सेवा संगम’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुर्ला पूर्व-मानखुर्द ते मुलुंड पूर्व या परिसरातील सुमारे १६० स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात उद्घाटन सत्रासह अन्य तीन सत्रे झाली.

या क्षेत्रातील संस्थांचा एकमेकांना परिचय करून देण्यात आला. पुढील मुक्त सत्रात, आपापल्या क्षेत्रात कामकरताना येणार्‍या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी हिंदी विवेक मासिकाच्या सेवा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. हिंदी विवेकचे अमोल पेडणेकर तेव्हा मंचावर उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@