भुसावळ न.पा. रुग्णालयाजवळील व्यापार संकुल बनले मद्यपींचा अड्डा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |
 
 
भुसावळ न.पा. रुग्णालयाजवळील व्यापार संकुल बनले मद्यपींचा अड्डा
भुसावळ, 4 मार्च
भुसावळ नगर पालिकेच्या रुग्णालयाजवळील व्यापार संकुल हे खुला बार बनले असून येथे मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो. पोलीसांचे याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. पण मद्यपींचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.
शहरात मध्यवर्तीभागात पालिकेचे रुग्णालय आहे. या रुग्णालयास लागुनच व्यापार संकुल आहे.सायंकाळी अंधार पडताच येथे मद्यपी त्यांची शाळा भरवत असतात.या व्यापार संकुलाच्या वरच्या मजल्यावर प्रत्येक कोप­यात दारुच्या बाटल्या, सिगरेटची पाकिटे, गुटखा आदि फेकलेले दिसते. मद्यपी मद्य प्राशान करून खाली बाटल्या जिन्यात, कोप­याच फोडत असतात. याचा त्रास संकुलातील वरच्या मजल्यावरील दुकानधारक व सामान्य नागरिकांना होत असतो.
या संकुलापासून हाकेच्या अंतरावर शहर पोलीस ठाणे आहे. तसेच संकुला पासून 5 मिनिटे अंतरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. असे असतांना मद्यपींचा वावर येथे दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकांना त्रास होत असून प्रशासनाने कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@