शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून भरीव निधी- ना . रावल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |
 
 
 


शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून भरीव निधी

-पालकमंत्री जयकुमार रावल

 

नंदुरबार : प्रत्येक शहरात प्रदुषनाचा प्रश्न भेडसावत आहे. म्हणुन शहरात उद्यानाची गरज महत्वाची आहे. समाजातील सर्वच घटकांसाठी बगिचा श्र्वासाचे केंद्र असुन शहाद्यात तिन दशकांनंतर महात्मा गांधी उद्यांन पुनरजिवीत होत आहे. शहराचा दुष्टीनेही महत्वाची बाब असुन शहराचा जलद गतीने विकासाठी जिल्हा नियोजन समितीतुन भरीव निधी तरतूद केली जाईल असे आश्वासन राज्याचे पर्यटन मंञी तथा पालक मंञी जयकुमार रावल यांनी शहादा येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन प्रसंगी दिले.

 
 

शहादा पालिकेचा सुमारे दोन कोटी रूपये खर्चाचा महात्मागांधी उद्यान नुतनीकरण व एस टी स्टड ते स्टेट बॅक रस्त्यावरील नवीन दुभाजक, फुटपाथ , आणि गटावर नवीन स्लॅब टाकण्याचा एक कोटी रुपया खर्चाचा कामांचे भुमिपुजन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. डॉ हिना गावीत आ. उदेसिंग पाडवी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी , प्रांताधिकारी साताळकर, तहसिलदार मनोज खैरनार , जि प सदस्य अभिजित पाटिल , जितेंद्र जमदाळे , डॉ. किशोर पाटील , मुख्याधिकारी राहुल वाघ आदि उपस्थित होते.

 
 

मंत्री जयकुमार रावल पुढे म्हणाले प्रत्येक शहरासाठी प्रदुषणाचा प्रश्न भेडसावत आहे त्यातून स्मार्ट सिटीची संकल्पना पुढे आली. उद्यान हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे. उद्यान पर्यटनाचेच केंद्र असुन शहर विकासात उद्यानालाही तेवढेच महत्व आहे. गेल्या आठ ते दहा वर्षात शहराचा विकास खुंटल्याने जिल्ह्यात मागे पडले मात्र आता शहरात विकास कामाना जोराने सुरवात झाली आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प , भुमिगत गटारी यासह सकारात्मक राजकारणातुन शहराचा जलद विकास होण्याकरिता जिल्हा नियोजन विकास मंडळातुन भरीव निधी देण्याचे त्यानी जाहीर केले.

 
 

खा. डॉ हिना गावीत म्हणाल्या 30 वर्षापुर्वीचे उद्यान नुतनीकरण होत असल्याने निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता होत आहे. उद्यान पर्यटनाचाच घटक असल्याने पर्ययन विभागातुन शहराचा विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा . शहराचा बाहेर चौपदरी मार्ग होत असल्याने या शहराला महत्व प्राप्त झाले असुन शहादा तालुक्यात एक हजार कोटीचा मॅगनेटीक महाराष्ट्र अंतर्गत प्रकल्प मंजुर झाला आहे . यासोबतच शहराचा वाहतुक प्रश्न सोडविण्या करिता शहराबाहेरुन रिंग रोड प्रकल्पासाठी प्रयत्न सुरु असल्याचा खा गावीत म्हणाल्या. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक अभिजित पाटील यानी केले. यावेळी नगरसेवक संदिप पाटील , संजय साठे , विद्या जमदाळे , नाना निकुम , संतोष वाल्हे , रेखा पाटील , वर्षा जोहरी , लक्ष्मण बढे . अरविंद कुवर , रिमा पवार , शबाना कुरेशी , रविंद्र जमादार , इकबाल शेख , रियाज कुरेशी , शमिन अंसारी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



@@AUTHORINFO_V1@@