शिवजयंती प्रित्यर्थ मुंबई विमानतळावर उभारण्यात आला रायगड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |

 
 
मुंबई : दरवर्षी शिवसेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते, त्याच प्रमाणे या वर्षी देखील तिथीनुसार आज शिवजयंती असल्यामुळे मुंबई विमानतळावर रायगडाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा म्हणून ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
 
 
 
 
पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्यासमोर रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आमदार अनिल परब आणि शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. भगवे झेंडे, तुताऱ्या, ढोलताशांच्या गजरात ३८८ व्या शिवजयंतीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@