भारताच्या शाहझार रिझवीचा विश्वविक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |

शाहझार रिझवीची विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी



ग्वादालाहारा (मेक्सिको) : ग्वादालाहारामध्ये कालपासून सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनच्या वर्ल्डकप सीरिजच्या पहिल्या टप्प्यात भारताच्या शाहझार रिझवीने १० मीटर एअर पिस्तुल या क्रीडाप्रकारातील पुरूषांच्या गटात सुवर्णपदक पटकावत एक नवा विश्वविक्रम नोंदवला आहे. तसेच महिला गटामध्ये भारताच्या मेहुली घोष हिने १० मीटर  एअर पिस्तुलमध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेतील भारताची सुरुवात ही अत्यंत चांगली झाल्याचे दिसत आहे.                                     
  
रिझवीने संपूर्ण सामन्याद्वारे सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली असून, १४ व्या गोळीनंतर आघाडी केली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवली. ग्रॅनादा (ईएसपी) २०१४ च्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ज्युनिअर म्हणून ९ व्या स्थानावर असलेल्या शाहझार या २३ वर्षीय खेळाडूने या स्पर्धेत २४२.३ गुणांसह सुवर्ण पदकाची कामगिरी केली.
जर्मनीच्या ख्रिस्टियन रिट्झने विश्वचषक स्पर्धेत प्रथमच एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठली असून २३९.७ गुणांसह रौप्यपदक मिळविले. पोडियमच्या तिसऱ्या पायरीवर शाहझारचा सहकारी जितू राय (३०) यांनी २१९.० गुण मिळवून कांस्यपदक पटकावले. तर भारताचे अंतिम खेळाडू ओम प्रकाश मिथरवल (२२) यांनी १९८.३ गुणांसह पहिल्या विश्वचषक स्पर्धेत चौथे स्थान पटकावले.
याबरोबरच अनुक्रमे ब्राझीलच्या शूटर ज्युलिओ आल्मेडा १७७.८ गुणांसह पाचव्या क्रमांकावर, पेरूच्या मार्को कॅरिलो १५४.२ गुणांसह सहाव्या, फ्रान्सच्या फ्लोरियन फाऊकेटने १३४.६ गुणांसह सातव्या तर संयुक्त राष्ट्र अमेरिकाच्या निकोलस मॉरर्र याने ११२.० गुणांसह आठवे स्थान मिळवले.





@@AUTHORINFO_V1@@