अफगाणिस्तानचा रशीद ठरला जगातील सर्वात 'तरुण' कर्णधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |




काबुल : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा भेदक गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा रशीद खान यांची अफगाणिस्तान संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या निवड सामन्यांसाठी आणि विश्वचषकासाठी म्हणून त्याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षीच रशीदची कर्णधारपदी निवड झाल्यामुळे जगातील सर्वात कमी वयाचा कर्णधार होण्याचा बहुमान त्याने पटकावला आहे.
अफगाणिस्तान संघाकडून नुकतीच या विषयी घोषणा करण्यात आली असून यापुढे संघाची संपूर्ण जबाबदारी रशीदवर देण्यात आली आहे. आपल्या अत्यंत कमी दिवसांच्या कारकिर्दीमध्ये त्याने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे त्याची विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली असल्याचे अफगाण क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. दरम्यान या निवडीमुळेच तो जगातील आतापर्यंतचा सर्वात कमी वयाचा कर्णधार ठरला आहे. या अगोदर बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार राजिन सालेह (वय २०) हा सर्वात कमी वयाचा कर्णधार म्हणून ओळखला जात होता. परंतु आता त्याच्या जागी रशीद हा सर्वात कमी वयाचा कर्णधार ठरला आहे.




दरम्यान गेल्या वर्षीच्या आयपीएल मौसामामध्ये सनराईज हैदराबाद संघाकडून खेळत असताना रशीदने केलेल्या उत्तम खेळीमुळे तो भारतात देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षीच्या आयपीएल मौसमात त्याने १४ सामन्यांमध्ये १७ बळी घेतले होते. त्यामुळे यंदाच्या मौसमासाठी देखील त्याला हैदराबाद संघाने ९ कोटी रुपये मोजून आपल्या संघामध्ये कायम ठेवले आहे.
@@AUTHORINFO_V1@@