एकी हेच कट्टरतेला दिलेले उत्तर : पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |


नवी दिल्ली : देशाच्या कोणत्याही भागामध्ये कोणत्याही कारणाने पसरत असलेल्या कट्टरतावादाला एकीच्या माध्यमातूनच उत्तर दिले जाऊ शकते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले आहे. कर्नाटकातील तुमकुरू येथील रामकृष्ण विवेकानंद आश्रमाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्यामुळे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थितांशी  संवाद साधला.

देशाचा कोणताही भूभाग, नागरिक अथवा समुदाय यांच्या मनात कधीही आपण या देशापासून किंवा येथील संस्कृतीपासून भिन्न आहोत असा विचार आला नाही पाहिजे, असे मत पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केले. तसेच अशाप्रकारच्या विचारांना दूर ठेवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांनी देशाची एकता आणि अखंडता या विचारांचा कायम आपल्या मनात आणि समाजात जागर केला पाहिजे, असे देखील ते म्हणाले.


याच बरोबर भारताची युवाशक्ती हीच नवभारताचा आधारवड असून “युवा देवो भव: - युवाशक्ति देवो भव:” हा भारत सरकारचा मंत्र आहे, असे ते म्हणाले. भारताची तरुण पिढी ही भूतकाळाचा फक्त विचारच करत नाही, तर त्यातून नवा बोध घेऊन आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न आहे व हे देशासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले.





तसेच भारत सरकारकडून देशातील युवा वर्गासाठी सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. देशातील युवकांना जागतिक स्पर्धेसाठी उत्तम बनविण्यासाठी त्यांना उत्तम शिक्षण दिले पाहिजे आणि त्यासाठी देशातील शिक्षणक्षेत्रात अमुलाग्र बदल करण्यासाठी देखील भारत सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@