पूर्वोत्तरात लाल सूर्य मावळून केसरिया सूर्याचा उदय : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |
 
 
मुंबई :   पूर्वोत्तरात खासकरून त्रिपुरात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाल्याप्रमाणे लाल सूर्य मावळला आहे आणि केसरिया सूर्य उगवला आहे. हा एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक विजय आहे. अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केल्या. मुंबई येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते आज बोलत होते.
 
 
 
 
 
"एक काळ असा होता की आम्ही गंमतीने म्हणायचो त्रिपुरा, नागालँड मध्ये आपलं राज्य येईल का? मात्र या पक्षाने जवळ जवळ संपूर्ण पूर्वोत्तर काबीज केलं. ज्याकाळात अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, त्यांनी पूर्वोत्तरसाठी एक नवीन मंत्रालय होतं. नंतरच्या काळात केंद्र सरकार ने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याकडे पैशाचा गैरवापर केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता हाती आल्या आल्या सगळ्यात आधी अॅक्ट ईस्ट पॉलिसी सुरु केली. भारताच्या सांस्कृतिक, राजकीय आणि प्राकृतिक दृष्ट्या ही राज्य खूप महत्वाची आहे हे पंतप्रधानांनी लक्षात घेवून या राज्यांच्या विकासासाठी कार्य केले." असेही ते यावेळी म्हणाले.
 
 

त्रिपुरा येथे ६ महीन्यात २७ कार्यकर्त्यांची हत्या झाली. केवळ हिंसेच्या जोरावर कम्युनिस्ट पक्ष राज्य करतो. केरळ पश्चिम बंगाल सगळीकडे असेच चित्र आहे. तरी देखील तेथे भाजपचा कार्यकर्ता खचला नाही. काल पंतप्रधान म्हणाले त्याप्रमाणे 'आता त्रिपुरामध्ये लाल सूर्य मावळला आहे आणि केसरिया सूर्य उगवला आहे.' देशात आता डावे नावाला उरले आहेत. 'लेफ्ट इस हार्डली लेफ्ट' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशभरातील भाजपचे कार्यकर्ते यामुळे खूप आनंदी आहेत. महाराष्ट्राच्या वतीने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पूर्वोत्तरातील सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 
आज जरी या राज्यांची लोकसंख्या कमी असली, तरी पूर्वोत्तरच्या राज्यांचे क्षेत्रफळ उत्तरप्रदेशच्या दीडपट आहे, ही राज्य अस्थिर रहावीत यासाठी काही बाजूचे देश प्रयत्न करत आहेत, मात्र या राज्यांच्या विकासासाठी देशात एकात्मतेसाठी पंतप्रधान कार्यरत आहे, आणि त्याचे फळ आज दिसून येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
नागरिकांनी मतपेटीच्या माध्यमातून आपला विश्वास दर्शवला :
 
त्रिपुरामदध्ये सुमारे २५ वर्ष डाव्यांचे राज्य होते. मात्र पंतप्रधानांचे विकास आणि विश्वास हे सूत्र तर अध्यक्ष अमित शहा यांचे कुशल नेतृत्व यामुळे हा विजय आज मिळाला आहे. पंतप्रधान म्हणाल्याप्रमाणे 'नो वन टू won' हा प्रवास खूप महत्वाचा आहे. नागरिकांनी मतपेटीच्या माध्यमातून आपला विश्वास दर्शवला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
 
आदिवासी समाजाचा भाजपवर विश्वास :
 
पूर्वोत्तर राज्यांमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे, या निवडणूकीत सर्व आदिवासी जागांवर भाजप निवडून आला आहे. आदीवासी समाजाने भारतीय जनता पक्षावर प्रचंड मोठा विश्वास दाखवला आहे. ही खूप महत्वाची बाब आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
 
ही निवडणूक पंतप्रधानांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांसाठी झणझणीत अंजन :
 
जे लोक पंतप्रधानांच्या नेतृत्वावर एक पोटनिवडणूक हरले की प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यांच्यासाठी ही निवडणूक डोळ्यात झणझणीत अंजन आहे. पाच वर्षात सलग सर्व निवडणूका जिंकणं हा इतिहास आजवर घडला नव्हता. आधी हा पक्ष काही राज्यांचा, उत्तरेचा होता, मात्र आता हा पक्ष संपूर्ण देशाचा पक्ष झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
हे फक्त 'ट्रेलर' आहे :
 
ही निवडणूक फक्त 'ट्रेलर' आहे. देशाच्या ७८% भूभागावर भाजप आणि एनडीएची सत्ता आहे. येत्या काळात कर्नाटक मध्ये देखील आणि २०१९च्या लोकसभा निवडणूकींमध्ये पुन्हा एकदा केंद्रात भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करेल यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@