'डंकर्क'च्या बदल्यात 'हे राम'!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2018
Total Views |

 
हॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलान हे तीन दिवसांच्या भारतीय दौऱ्यावर आहेत. नोलन यांच्या या दौऱ्याचे महत्वाचे कारण म्हणजे, सध्याच्या डीजिटल युगात त्यांना 'रीळ'चे (सेल्युलॉयडच्या माध्यमातून तयार होणारे चित्रपट ) महत्व पटवून द्यायचे आहे. या दौऱ्यात त्यांनी काल प्रसिद्ध अभिनेते कमल हसन व शाहरुख खान यांची भेट घेतली. 'फिल्म हेरिटेज फाऊंडेशन'तर्फे घेण्यात आलेल्या 'रिफार्मिंग दि फ्युचर ऑफ फिल्म' या विषयावरील परिषदेत नोलन मार्गदर्शन करणार आहेत. शिवेंद्र डोंगरपूर यांनी या परिषदेचे भारतात आयोजन केले आहे.
 
 
 
या भेटीचा उल्लेख करताना हसन यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, ''क्रिस्तोफर नोलन यांना भेटलो. मी त्यांचा डंकर्क' डिजिटल स्वरूपात पहिला त्याबद्दल मी दिलगीर आहे. पण त्याबदल्यात मी त्यांना माझा 'हे राम' डिजिटल स्वरूपात पाहण्यासाठी दिला आहे. नोलन यांनी माझा 'पापांनासाम' हा चित्रपट बघितल्याचे कळल्यावर अवाक झालो.''
 
 

शाहरुखने देखील त्यांचा भेटीचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तो म्हणतोय, ''माझ्यासाठी हा 'फॅनबॉय' क्षण आहे. नोलन यांचे भाषण माझ्यासाठी खरंच प्रेरणादायी होते. मला इथे बोलावल्याबद्दल शिवेंद्र डोंगरपूरचे आभार.''
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@