जपान आणि चीनमध्ये होणाऱ्या ऑलम्पिकमध्ये उत्तर कोरिया भाग घेणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
येत्या दोन वर्षांमध्ये जपान आणि चीनमध्ये होणाऱ्या ऑलम्पिक खेळांमध्ये उत्तर कोरिया भाग घेणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी दिली आहे. थॉमस बाक यांनी उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जाँग उन यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
 
 
 
बीजिंगमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत थॉमस बाक यांनी ही माहिती दिली. २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या उन्हाळी ऑलम्पिक खेळांमध्ये आणि २०२२ मध्ये बीजिंग येथे होणाऱ्या हिवाळी ऑलम्पिक खेळांमध्ये उत्तर कोरिया भाग घेणार असल्याची माहिती थॉमस बाक यांनी यावेळी दिली आहे.
 
 
 
आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती दक्षिण कोरियासोबत सकारात्मक संबंध पुढे असेच सुरु ठेवेल आणि दक्षिण कोरियामध्ये याआधी झालेल्या हिवाळी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेवून दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांचे संबंध बऱ्याच प्रमाणात चांगले झाले आहे. त्यामुळे येत्या काही दशकांमध्ये उत्तर कोरियाचा खेळ सुधारेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@