निर्मला सितारमण येत्या ३-५ एप्रिलला रशियाच्या दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या येत्या ३-५ एप्रिलला रशिया देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ‘आंतरराष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर होणाऱ्या सातव्या मॉस्को सम्मेलनात भाग घेण्यासाठी त्या पुढील आठवड्यात रशिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. संरक्षण मंत्रीच्या रुपात निर्मला सीतारमण यांचा हा पहिलाच रशिया दौरा असणार आहे.
 
 
 
तीन दिवसांच्या या दौऱ्यात त्या सातव्या मॉस्को सम्मेलनात भाग घेतील तसेच ‘जागतिक सुरक्षितते’वर भारताकडून त्या भाष्य करतील. यावेळी त्या रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सर्जेई शोइगू आणि अनेक वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधतील. ‘जागतिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर हे सम्मेलन आयोजित करण्यात आले असून या सम्मेलनात विविध देशांचे वरिष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री भाग घेणार आहेत. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@