भारत आणि तिबेट संबंध कधीही न तुटणारे - डॉ. महेश शर्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
धर्मशाला : भारत आणि तिबेट यांच्यामधील संबंध कधीही न तुटणारे असून फूल आणि सुगंधाचे जसे नाते आहे, तसेच भारत आणि तिबेटचे नाते आहे, असा प्रेमळ संदेश केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी आज दिला.
 
सेंट्रल तिबेटी प्रशासनाच्या वतीने हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे आयोजित केलेल्या तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांच्या "थँक्यू इंडिया" या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शर्मा यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव, खासदार सत्यव्रत चतुर्वेदी (काँग्रेस) न शांता कुमार (भाजप) हेदेखील उपस्थित होते. 
 
 
 
 
डॉ. महेश शर्मा पुढे म्हणाले की, माझा भारत आणि तिबेटच्या संबंधांवर पूर्ण विश्वास आहे, त्यासाठी आभार मानण्याचीही गरज नाही. जेव्हा आपण जगाला शांतता, मानवतेचा आणि बंधुभावाचा संदेश देतो तेव्हा तिबेटची संस्कृती ही त्यातील अविभाज्य अंग आहे. आम्ही तिबेटी संस्कृतीमधील वारसा आणि इतिहासाचे रक्षण आणि समर्थन करण्यास वचनबद्ध आहोत. याबरोबरच निर्वासित हा शब्द कोणीही कुठेही उद्गारणे हे वेदनादायक आहे. तिबेटियन हे भारताचे आदरणीय पाहुणे आहेत त्यामुळे बंधुता आणि एकतेचे हे नाते आम्हाला आवडते, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
 
 
 
 
"थँक्यू इंडिया" हा कार्यक्रम आधी नवी दिल्लीमध्ये होणार होता, मात्र लामांच्या या कार्यक्रमाचा कसलाही अनुचित परिणाम भारत-चीन संबंधांवर होऊ नये, म्हणून भारत सरकारकडून या कार्यक्रमाला नकार देण्यात आला होता. त्यामुळे हा कार्यक्रम धर्मशाला येथे घेण्यात आला.
 
 
 
 
पण भारत सरकारने या कार्यक्रमाला नकार दिल्यानंतर सर्वच स्तरातून भारत आणि तिबेटच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते, मात्र आता भारताचे केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने या दोन राष्ट्रातील संबंधांच्या चर्चा थंडावतील अशी चिन्हे दिसत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@