आनंदी गोपाळ जोशी यांना गुगलकडून अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2018
Total Views |
 
  
 
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांच्या १५३ व्या जयंती निमित्त गुगल डुडलच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. आनंदी जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ मध्ये कल्याण येथे झाला असून त्यांचा मृत्यू २६ फेब्रुवारी १८८७ रोजी पुण्यामध्ये झाला. बेंगळूरमधील कलाकार कश्मीरा सरोदे यांनी हे गुगल डुडल तयार केले आहे. यामध्ये आनंदी जोशी यांना हातात डिग्री आणि गळ्यात स्टेथस्कोप घातलेले दाखवण्यात आले आहे.
 
ज्या काळात महिलांना घराबाहेर पडून शिक्षण घेण्याची मुभा नव्हती त्या काळात आनंदी जोशींनी परदेशात जाऊन डॉक्टरकीचे शिक्षण घेतले. नवव्या वर्षी त्यांचे लग्न त्यांच्याहून २० वर्षे मोठ्या वयाच्या गोपाळ जोशी यांच्याशी झाले. त्यानंतर १४ व्या वर्षी त्यांनी बाळाला जन्म दिला मात्र ते १० व्या दिवशीच ते बाळाचा मृत्यू झाल. त्यांच्या आयुष्यातल्या या दूर्दैवी घटनेमुळेच त्यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. गोपाळ जोशी यांनीही त्यांना प्रोत्साहन देत १६ व्या वर्षी पुढिल शिक्षणासाठी अमेरिकेतील पेनसिल्वेनिया येथील महिला वैद्यकीय विद्यालयात पाठवले.
 
डिग्री घेऊन आनंदी जोशी मायदेशी परतल्या. मात्र प्रकृती अस्वास्थ्य आणि टिबीच्या रोगाचे कारण होऊन वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. यामुळे अल्पवयीन मृत्यू थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या उद्देशाने डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेल्या आनंदी जोशी त्यांचे स्वप्न साकार करु शकल्या नाहीत.
 
मात्र त्याकाळाही परदेशातून डॉक्टरकीचे शिक्षण घेऊन परतणे हा सगळ्या भारतीय महिलांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. त्यांनी त्यांच्या काळातील मुलींना हिंमत आणि जिद्दीच्या जोरावर आपले स्वप्न साकार करण्यासाठी लढण्याची ताकद दिली.
@@AUTHORINFO_V1@@