जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस अधिकारी शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या अज्ञात दहशतवादी हल्ल्यात गंभीरपणे जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचा आज रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आज सकाळी पुलवामा भागात काही अज्ञात दहशतवाद्यांनी अचानक पोलिसांवर हल्ला केला या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाले होते.
 
 
 
आता संध्याकाळच्या दरम्यान रुग्णालयातील वैद्यांनी या अधिकाऱ्याला मृत घोषित केले आहे. त्यामुळे या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे. आज सकाळी दहशतवाद्यांकडून अचानक हल्ला करण्यात आला या हल्ल्याला पोलीस अधिकाऱ्यांनी देखील चोख प्रतिउत्तर दिले. तसेच या हल्ल्यात एक स्थानिक रहिवासी मोहम्मद अश्रफ हे देखील जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. 
 
 
 
काल देखील सीमेवर गस्त घालत असलेल्या भारतीय जवानांवर मध्यरात्री अचानक काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला असून प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेनेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात एक दहशतवादी ठार झाला होता. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@