सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानांवर दहशतवादी हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2018
Total Views |

एक दहशतवादी ठार तर एक जवान जखमी




शोपिया : सीमेवर गस्त घालत असलेल्या भारतीय जवानांवर काल मध्यरात्री अचानक काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला असून प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेनेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात एक दहशतवादी ठार झाला आहे. तर उरलेले दहशतवादी फरार झाले आहेत. दरम्यान जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

शोपियामधील अहमगाव येथील सीमेजवळ काल मध्यरात्री ही घटना घडली. लष्कराची ४४ राष्ट्रीय रायफलची तुकडी सीमेवर गस्त घालत असताना, काही दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या ह्ल्लामुळे तुकडीतला फक्त एकच जवान जखमी झाला. यानंतर भारतीय लष्कराने देखील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत, एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. बराच वेळ दोन्ही बाजूने गोळीबार सुरु असतानाच अंधाराचा फायदा घेत दहशतवादी याठिकाणाहून फरार झाले. यानंतर भारतीय सैनिकांनी आजूबाजूच्या सर्व परिसराला घेराव घालून दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान शोपियामधील बीजबेहारा या गावामध्ये देखील काही दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली आहे. मुश्ताक अहमद शेख असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून जम्मू-काश्मीर पोलीस विभागात ते एसपीओ म्हणून कार्यरत होते. काल रात्री काही दहशतवाद्यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला व फरार झाले. या हल्ल्यामध्ये शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीला देखील गोळी लागल्यामुळे त्या जखमी झाल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@