पालिका यंदा २७९ पंप भाडेतत्वावर घेणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2018
Total Views |

५४ कोटी रुपयांचा खर्च

 
 
 
मुंबई : मुंबई महानगर पालिका पावसाळ्यात सचणाऱ्या पाण्याचा निचरा व्हावा, म्हणून यंदा २७९ पंप खाजगी कंत्राटदाराकडून भाड्याने घेणार आहेत. त्यासाठी ५४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पालिका हे पंप भाड्याने घेते. गेल्यावर्षी २९५ पंप भाड्याने घेतले होते. पंप भाड्याने घेण्याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
 
 
मुंबईत अतिवृष्टी झाल्यास व त्याच वेळी समुद्राला मोठी भरती असल्यास शहर व उपनगरे येथील सखल भागात पाणी साचते व त्याचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतो. महापालिकेने पावसाळ्यात मुंबई पाणी साचू नये व त्याचा रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना राबवित आहे.
 
 
यंदा पालिकेने २४ वॉर्ड व २ रुगणालये याठिकाणी एकूण १४ गट निर्माण करून २७९ पंप भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये, कुर्ला वॉर्डमध्ये सर्वाधिक २६ पंप, त्याखालोखाल परळ विभागात २३ पंप बसविण्यात येणार आहेत. सर्वात कमी पंप केईएम रुग्णालय येथे केवळ - २ पंप तर सायन रुग्णालय येथे ३ पंप बसविण्यात येणार आहेत.
 
दरम्यान पालिकेने ५ ठिकाणी एका सेकंदाला ३० ते ३६ हजार दशलक्ष लिटर पाण्याचा निचरा करणाऱ्या पंपिंग स्टेशनची उभारणी करून ते कार्यान्वित केल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@