अमेरिकीचे 'अॅक्शन' रशियाची 'रिअॅक्शन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2018
Total Views |

अमेरिकेच्या ६० राजदूतांना रशिया पाठवणार मायदेशी





मॉस्को :
रशिया राजदूतांना अमेरिकेबाहेर काढण्याच्या ट्रम प्रशासनच्या आदेशावर आता रशियाने देखील जशासतशी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने ६० रशियन राजदूतांना देशातून बाहेर हाकलण्याचे आदेश दिल्यानंतर आता रशियाने देखील आपल्या देशात असलेल्या अमेरिकेच्या ६० राजदूतांना आपल्या मायदेशी परत जाण्याचे आदेश दिले आहेत.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी याविषयी घोषणा करत अमेरिकन राजदूतांना देश सोडून जाण्यासाठी एक आठवड्याची मुद्दत दिली आहे. यावर बोलताना त्यांनी अमेरिकेच्या वर्तनावर थेट टीका केली. 'अमेरिकेने रशियाच्या राजदूतांवर कारवाई करण्याअगोदर आपल्यालाही रशियाकडून अशाच प्रकारचे प्रत्युत्तर मिळू शकते, याचा विचार अमेरिकेने करायला हवा होता', अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.

रशियाच्या या निर्णयानंतर नुकतीच अमेरिकेने देखील यावर प्रतिक्रिया देत, रशियाने यावर चर्चा करणे अपेक्षित होते, असे म्हटले आहे. ब्रिटेनमध्ये झालेल्या घटनेची कसल्याही प्रकारची माहिती न घेता रशियाने अमेरिकन राजदूतांवर जी कारवाई केली आहे, यावरून हे सिद्ध होते कि रशिया चर्चेसाठी आणि दोन देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी तयार नाही, अशी प्रतिक्रिया अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.




@@AUTHORINFO_V1@@