'त्या' ३९ भारतीयांचे मृतदेह येणार भारतात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2018
Total Views |


नवी दिल्ली : मोसुलमध्ये इसीसकडून मारलेल्या गेलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात परत आणण्यासाठी भारतात सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेरकार यश आले आहे. या सर्व ३९ भारतीयांचे मृतदेह परत भारतात आणण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री वी.के.सिंग हे लवकरच इराककडे रवाना होणार असून येत्या २ एप्रिलला ते भारतात परत येणार आहेत. भारतात परत असल्यानंतर ते परस्पर मृतांची संबंधी राज्यांमध्ये जाऊन त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देणार असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 
भारतीय वायू सेनेच्या एका विशेष विमानामधून सिंग हे उद्या रात्री इराकसाठी रवाना होणार आहेत. यानंतर ते १ तारखेला त्याठिकाणी जाऊन सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करतील व २ तारखेला सर्व मृतदेहांसह भारतामध्ये परत येतील. परंतु भारतामध्ये ते नवी दिल्ली येथे न जाता ते सर्वात प्रथम थेट पंजाबला जातील. पंजाब येथील अमृतसर येथे उतरून मृतांच्या संबंधित नातेवाईकांची भेट घेतील व मृतदेह त्यांच्या ताब्यात देतील. यानंतर उरलेल्या बाकीच्या राज्यांमध्ये देखील जाऊन पिडीत कुटुंबियांची ते भेट घेतील व मृतदेह त्यांच्या ताब्यात देतील. 
गेल्या दोन वर्षांपासून इराकमध्ये गेलेल्या ३९ भारतीय नागरिकांचे इसीसने अपहरण केले होते. अनेक दिवसांच्या शोधानंतर या सर्व  भारतीय नागरिकांची इसीसने हत्या केल्याचे समोर आले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत याविषयी माहिती दिल्यानंतर संपूर्ण देशातून वर हळहळ व्यक्त करण्यात येत होती. यावेळी स्वराज यांनी या सर्व भारतीय नागरिकांचे मृतदेह आणि अवशेष भारतात लवकरच परत आणणार असल्याचे स्पष्ट केले होते.
@@AUTHORINFO_V1@@