सिद्धरामय्या शासनकाळात संघ-भाजप कार्यकर्त्यांची हत्या होणे दुर्दैवी - अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2018
Total Views |

 
म्हैसूर : सिद्धरामय्या यांच्या शासनकाळात संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या हत्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि त्या २४ कार्यकर्त्यांच्या खुन्यांना त्याची शिक्षा भाजप सरकार स्थापन झाल्यावर केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिले.
 
 
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय संसद कामकाजमंत्री अनंत कुमार आज कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. म्हैसूर जिल्ह्यात भाजप आणि संघ कार्यकर्ता राजू याची नुकतीच हत्या करण्यात आली. त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी अमित शाह, कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा गेले होते.
 
 
राजूचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. पोलिसांच्या हाती अद्यापही गुन्हेगाराचा थांगपत्ता लागलेला नाही. राजूचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला त्यात त्याच्या डोक्यावर मोठ्याप्रमाणात वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळमध्ये वैचारिक मतभेदातून कम्युनिस्ट पक्षातर्फे संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करण्याचे सत्र सुरु असताना, आता ते लोण कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात देखील पसरत चालल्याचे दिसून येत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@