थायलंडमध्ये बसला भीषण आग; २१ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2018
Total Views |

सर्व मृत व्यक्ती म्यानमारमधील निर्वासित




बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये आज एका बस लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ नागरिकांचा होपळून मृत्यू झाला आहे. विशेषः म्हणजे हे सर्व नागरिक मुळचे म्यानमारचे रहिवासी असून थायलंडमधील एका कंपनीमध्ये कामासाठी म्हणून ते याठिकाणी आले होते. परंतु बसला अचानक आग लागल्यामुळे या सर्व नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

थायलंडमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंडमधील टाक प्रांतामध्ये ही घटना घडली आहे. थायलंडमधील नावा नाकोर्ण इंडस्ट्रीयल झोनमध्ये या सर्व नागरिकांची कामगार म्हणून नोंदणी करून त्यांना दुसरीकडे घेऊन जाण्यात येत होते. यावेळी बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. ज्यामध्ये बसचा चालक आणि त्याची पत्नी वगळता उरलेले सर्व ४८ नागरिक हे म्यानमारचे रहिवासी होते. आज पहाटेच्या सुमारास बस बँकॉक मधील एक तक्सिन महेरात नॅशनल पार्कजवळून जात असताना बसच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. व त्यानंतर क्षणार्धातच ही आग संपूर्ण बसमध्ये पसरली. यामध्ये २१ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर उरलेले सर्व कामगार ही गंभीर जखमी झाले आहेत. यासर्व कामगारांवर सध्या उपचार असून यातील काही जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे बँकॉक पोलिसांनी सांगितले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@