छत्तीसगडमध्ये ५९ नक्षलवादी समर्थक पोलिसांना शरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2018
Total Views |


बस्तर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बस्तर प्रांतामध्ये तब्बल ५९ नक्षलवादी समर्थक पोलिसांना शरण आले आहेत. यामध्ये काही महिलांचा देखील समावेश असून हे सर्व जण बस्तरमधील वेगवेगळ्या गावांमधून पोलिसांना शरण आले आहेत.

बस्तर प्रांतातील दुबनकोंटा, गगनपल्ली आणि कोंगडाम या तीन गावांमधून हे सर्व नक्षलवादी समर्थक पोलिसांना शरण आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही गावांमधून जवळपास ६०० नागरिकांची चौकशी करण्यात येत होते. त्यातील या ५९ नागरिकांनी आपण माओवादी समर्थक असल्याचे मान्य केले तसेच आपणाला पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात परत यायचे आहे, असे पोलिसाना सांगितले. यानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे. तसेच हे सर्व जण स्वइच्छेने पोलिसांना शरण आले आहेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

'देशातील 'लाल' दहशतवादासंबंधी नागरिकांमध्ये आता अत्यंत वेगाने जागृती होऊ लागली आहे, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी यावेळी दिली. नक्षलवादामुळे आपली आणि समाजाची काय हानी होऊ शकते हे सामान्य नागरिकांना आता कळू लागले आहे. त्यामळे नागरिक आता स्वतःहून नक्षलवादाची साथ सोडत आहेत, हे एक अत्यंत चांगले चिन्ह असून यामुळे नक्षलवाद लवकरच नष्ट होईल, असे मत पोलीस अधीक्षक अभिषेक मीना यांनी व्यक्त केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@