चाळीसगावात अर्धवट जळालेला मृतदेह सापडला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2018
Total Views |
 
चाळीसगावात अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
जळगाव, 3 मार्च
चाळीसगाव – नांदगाव रस्त्यालगत खडकी शिवारात एक अज्ञात तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. घटनास्थळी राखाडी रंगाची ओढणी आढळून आली आहे. तरुणीला जाळून मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 
 
खडकी शिवारात समाधान कोळी यांच्या शेतात आरोपींनी शुक्रवारी रात्री तरुणीला पेटवून दिले असावे. घटनेची माहिती मिळताचा पोलिस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील, पो.नि. रामेश्वर गाढे पाटील, उपनिरीक्षक घोळवे, शशिकांत पाटील यांनी भेट दिली. पंचनामा करण्यात आला असून या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मृतदेह तरुणीचा आहे की महिलेचा याचासुध्दा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींचा माग घेण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्याची तयारी केली होती.
 
 
या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@