महानगरपालिका अंदाजपत्रक ७ मार्च रोजी सादर होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीतील १६ पैकी आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झालेले असून उरलेल्या सदस्यांपैकी पाच सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे. अशा स्थितीत अवघ्या तीन सदस्यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दि. ७ मार्च रोजी अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
विशेष म्हणजे समितीच्या रिक्त जागांवर नियुक्तीसाठीदेखील याचवेळी म्हणजे सकाळी ११ वाजता महासभा बोलाविली असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या विलंबाने अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यातच समितीत शिवसेनेचे दोन आणि एक अपक्ष असे अवघे तीन सदस्य आहेत. कायदेशिरदृष्ट्या समितीच परिपूर्ण गठीत नसताना आणि गणपूर्तीइतके संख्याबळ नसताना सादर होणार्‍या या अंदाजपत्रकावर भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी आक्षेप घेतला आहे.
 
 
यंदा आयुक्त अभिषेक कृष्ण यांची झालेली बदली आणि नूतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला या घडामोडींमुळे अद्यापही प्रशासनाचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर झालेले नाही. ७ मार्च रोजी अंदाजपत्रक सादर होणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@