कर्जमाफी योजनेपासून वंचित शेतकर्‍यांना मार्च अखेरपर्यंत संधी : सुभाष देशमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2018
Total Views |
 

 
 
 
नाशिक : ‘‘जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’चा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न असून योजनेपासून वंचित राहणार्‍या शेतकर्‍यांना सामावून घेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. काही कारणास्तव अर्ज भरु न शकलेल्या पात्र शेतकर्‍यांना ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील,’’ असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार विभागाच्या आढावा बैठकप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, अनिल कदम, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) निळकंठ करे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल आदी उपस्थित होते.
 
यावेळी देशमुख म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार आत्तापर्यत राज्यात २५ जिल्ह्यातील कर्जमाफी योजनेच्या कामाचा आढावा प्रत्यक्ष घेण्यात आला आहे. अडचणीतील शेतकर्‍यांना दिलासा देतानाच त्यांचे उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजनांवर अंमलबजावणी केली जात आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात कांदा विक्रीची रक्कम थेट जमा केली जावी, यासाठी व्यापारी व बँकांनी आरटीजीएस पद्धतीचा वापर करावा. शेतकर्‍यांना मिळणारे धनादेश वटण्यामध्ये वेळ जाऊन रक्कम थकित राहण्याचे प्रमाण वाढते. चांगला भाव आल्यानंतरच शेतकर्‍यांनी उत्पादने विकणे गरजेचे असून यासाठी शेतमाल तारण योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. सोयाबीनच्या बरोबरच इतर उत्पादनांसाठीदेखील या पद्धतीचा उपयोग करणे गरजेचे आहे. कांदा, मका, गहू आदीं बरोबर भाजीपाल्याद्वारेदेखील शेतकर्‍याला चांगले उत्पन्न मिळू शकते’’.
 

जिल्हा बँकेला आर्थिक सहाय्याचे सुभाष देशमुख यांचे आश्वासन
 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी बँकेचे अध्यक्ष केदा नाना आहेर यांनी सहकार पणन व वस्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांना निवेदन दिले. देशमुख यांनीही सकारात्मक निर्णय घेऊन बँकेचे अध्यक्ष केदा नाना आहेर यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. बँकेचे अध्यक्ष केदा नाना आहेर यांनी देशमुख नाशिकमध्ये आले असता जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत भांडवल पर्याप्ता राखण्यासाठी राज्य शासनाकडे १२५ कोटीची मागणी केली व तसेच २.५ % रक्कमेवरील व्याज परतावाची २७ कोटीची रक्कम मिळावी याबाबत निवेदन दिले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारीं अधिकारी बकाल यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती दिली व बँक भांडवल पर्याप्त राखण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनाची माहिती सादर केली. याप्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक गणपत पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदाार सीमा हिरे, अनिल कदम, धनंजय पवार, संदीप गुळवे तसेच आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे आदी उपस्थित होते
 
@@AUTHORINFO_V1@@