राहूल गांधी तुम्हाला हे मान्य आहे का : स्मृती इराणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून बदनाम झालेले संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जाऊन आता जवळपास ४ वर्षे होत आली तरीही त्या सरकारच्या काळात घेडलेले गैरप्रकार अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीत. मनमोहन सिंग सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची व गैरव्यवहाराची यादी अजूनही सुरुच असल्याची आणखी एक बाब समोर आली आहे. स्टेट बँक इंडियाच्या एका अधिकाऱ्याला लाच दिल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून ज्या आरोपीचा तपास सुरु आहे अशा वादग्रस्त व्यक्तीकडून दुसरे तिसरे कोणी नाही तर तत्कालीन कायदा व न्याय मंत्री कपिल सिब्बल चक्क काही कोटी रुपये किंमतीची कंपनीच विकत घेतल्याचा आरोप भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे पक्षाच्या मुख्यालयात त्यांनी आज याविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अशा कोणत्याही व्यक्तीकडून कंपनी खरेदी करण्याचा सिब्बल यांना कायदेशीर अधिकार असला तरीही पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांना राजकीय दृष्ट्या हे मान्य आहे का असा सवालही इराणी यांनी उपस्थित केला आहे.
 
 
मे २०१३ ते मे २०१४ या कपिल सिब्बल कायदा व न्याय मंत्री असतानाच्या काळात वर्ल्डस् विंडो ग्रुपचे अध्यक्ष पियुष गोयल नावाच्या व्यक्तीविरोधात स्टेट बँकेतील एका अधिकाऱ्याला लाच दिल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाच तपास सुरु होता. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेतील एका वृत्त संकेतस्थळाने पियुष गोयल मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोपही केला होता. केवळ तेवढेच नव्हे तर भारतातही एका ऑनलाईन संकेतस्थळाने याबाबत लेख लिहिला होता अशी माहिती इराणी यांनी दिली.
 
 
ज्या व्यक्तीवर लाच देण्याचा आरोप आहे, ज्या व्यक्तीवर बेकायदा मनी लॉन्डरिंगचा आरोप आहे अशा व्यक्तीकडून स्वतः कायदा मंत्रीपदावर असताना कंपनी खरेदी करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न इराणी यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भातील अनेक तपशील इराणी यांनी आज उपस्थित केले. त्यामुळे आता राहूल गांधी व स्वतः कपिल सिब्बल यावर काय भाष्य करणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@