पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारत-जपान संबंध सृदृढ : सुषमा स्वराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2018
Total Views |

 
 
टोकियो :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि जपान यांच्यातील संबंध अधिक बळकट झाले आहेत, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केले. टोकियोच्या विवेकानंद कल्चरल सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रवासी भारतीयांचा संमेलनाला त्या संबोधित करत होत्या. सुषमा स्वराज २८ मार्च ते ३० मार्च या तीन दिवसीय जपान दौऱ्यावर आहेत.
 
 
 
 
 
 
प्रवासी भारतीयांनी भारताची चांगली प्रतिमा निर्माण केली :
 
जपान येथे भारताची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रवासी भारतीयांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानामुळेच भारत आणि जपान यांच्यातील संबंध अधिक बळकट झाले आहेत, असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.
 
वर्तमान काळात भारत आणि जपान यांच्यातील संबंध पूर्वीपेक्षा अधिक चांगले आहेत, याचे मोठे कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यातील मैत्री आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
सुषमा स्वराज ९ व्या भारत-जपान राजकीय चर्चेत तारो कोनो यांच्यासह भाग घेणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@