शशी थरूर विसरले महावीर आणि बुद्ध यांच्यातील फरक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2018
Total Views |

भगवान महावीर जयंतीच्या पोस्टरमध्ये भगवान गौतम बुद्धांचा फोटो

 
काँग्रेस नेते आणि माजी मनुष्यबळ विकास मंत्री शशी थरूर यांना चक्क भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्यातील फाराकारचे विस्मरण झाले आहे. महावीर जयंती निमित्त शुभेच्छा देताना त्यांनी पोस्टरमध्ये चक्क भगवान गौतम बुद्धांचा फोटो वापरला आहे.
 
 
त्यामुळे थरूर हे नेटीझन्सच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. 'व्हाय आय एम हिंदू' असे पुस्तक लिहिणाऱ्या थरूर यांना हिंदुत्वातून निर्माण झालेल्या या पंथांबद्दल नेमकी माहिती नसावी हा मोठ्ठा आश्चर्याचा विषय आहे. जबरदस्तीचे हिंदुत्व पत्करले की असेच होते, असा टोला नेटीझन्सनी थरूर यांच्या पोस्टवर हाणला आहे.
 

 
 
या पोस्टवर आपले म्हणणे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी हे चित्र ज्या हरीभूमी डॉट कॉम या संकेतस्थळावरून घेतले होते, त्याचा देखील उल्लेख केला आहे. अनेक लोक भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्यात फरक करू शकण्यात असमर्थ ठरतात, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर माझी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांनी आभार देखील मानले आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@