मुंबईकरांची दूषित पाण्यापासून सुटका होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2018
Total Views |

ऑर्गेनिक प्रक्रियेने १० मिनिटांत मिळणार स्वच्छ पाणी
योगीराज दाभाडकर यांच्या प्रयत्नांना यश
 

 
 
मुंबई : दूषित पाण्यापासून मुंबईकरांची सुटका होणार असून ऑर्गेनिक प्रक्रियेने १० मिनिटांत स्वच्छ पाणी मिळणार आहे. अंधेरी महानगरपालिकेच्या के- वेस्ट वॉर्ड प्रभाग समितीचे अध्यक्ष योगीराज दाभाडकर यांनी गटारातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ करून दाखवले आहे.
 
 
मुंबईत कित्येकदा पाणीटंचाईची समस्या उपस्थित होते. मुंबईचा पाणीप्रश्न हा एक ज्वलंत विषय आहे आणि तो सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याअनुषंगाने जर आपण अशापध्दतीने वापरलेले पाणी ऑर्गेनिक फिल्टर वापरून ते टॉयलेट फ्लश, गार्डनिंग, कपडे-भांडी धुण्याकरता वापरू शकतो. या कामांसाठी आपण ७५ टक्के पाणी वापरतो आणि २५ टक्के पाणी पिण्यासाठी, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी वापरले जाते. म्हणजेच आर्गेनिक फिल्टरने ७५ टक्के पाण्याची गरज आपण हे पाणी वारंवार वापरून कालांतराने की संपुष्टात आणू शकतो.
 
 
मुंबईत ब्रिटिश काळापासून सांडपाणी थेट समुद्रात सोडणारी यंत्रणा कार्यरत आहे. योगीराज दाभाडकर यांच्या मनपा के- वेस्ट वॉर्डमधील दालनात गटारातील घाण पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयोग करण्यात आला. यावेळी स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजचे सहाय्यक अभियंता अनिल मेस्त्री, वर्सोवा पंपिंग स्टेशनचे असिस्टंट इंजिनियर सा.ज.खर्डे, पर्यावरण विभागाचे सहाय्यक अभियंता महेंद्र कांबळे, सहाय्यक विश्लेषक मंगेश हळदणकर, दुय्यम अभियंता पश्चिम उपनगर रमेश मुरारी, मलनि: स्सारण प्रचलनचे सहाय्यक अभियंता वि.द.कुलकर्णी, मुंबई मलनि:स्सारण प्रकल्प दुय्यम अभियंता विशाल लाटे, जल विभाग दुय्यम अभियंता विपुल बागडे उपस्थित होते.
 
 
हा प्रयोग आणि पाण्याची शुद्धतेबद्दल बोलताना सहाय्यक विश्लेषक मंगेश हळदणकर म्हणाले, " के पश्चिम प्रभाग समितीच्या कार्यालयात सादर केलेल्या सांडपाण्याच्या प्रयोगातून पाण्याचे नमुने जी-उत्तर येथील म्युनिसिपल लॅब मध्ये तपासणीकरता पाठवण्यात यावेत आणि अहवाल तपासूनच पडताळणी करावी"
 
 
आज प्यायलासुध्दा पाणी मिळत नाही. मात्र अशा अभिनव प्रयोगाने आपण पुन्हा एकदा मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देऊ शकतो. "सध्या के वेस्ट वॉर्डमध्ये दररोज सुमारे २५ कोटी लीटर पाणी पुरवले जाते. त्यापैकी जवळपास ८-१० कोटी लीटर पाणी गळतीमधून वाया जाते त्यामुळे ब-याचशा भागात आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा होत नाही. मात्र अशा प्रयोगामुळे पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल. मुंबई हे चहूबाजूंनी समुद्राने वेढलेले एक बेट आहे. मात्र मुंबईतील दूषित तसेच गटाराचे पाणी बऱ्याच ठिकाणी कुठलीही प्रक्रिया न करता तसेच समुद्रात सोडले जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात समुद्री प्रदूषण होते. याचा थेट परिणाम समुद्री जीवांवर तसेच मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या कोळीबांधवांवरही होत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी गटार तसेच सांडपाणी समुद्रात सोडले जाते ते जर अशाप्रकारे ऑर्गेनिक प्रक्रिया करून सोडले तर निश्चितच मुंबई व त्यासभोवतालचा समुद्र प्रदूषणमुक्त होईल आणि मत्स्यव्यवसायावरील संकट दूर होईल. तसेच आपण जर मुंबईचा समुद्रकिनारा स्वच्छ करू शकलो तर स्वच्छ समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल" असा विश्वास योगीराज दाभाडकर यांनी व्यक्त केला.
 
समुद्री प्रदूषण १०० टक्के संपवता येईल
," आम्ही प्रभाग क्रमांक ६०मधल्या सांडपाण्याच्या मोगरा नाल्यातील पाण्याचे नमुने घेऊन ऑर्गेनिक प्रक्रिया करून १० मिनिटांत पाणी स्वच्छ करण्यात यश मिळवले आहे. पुढील काही दिवसांत हा पायलट प्रकल्प म्हणून मोगरा नाल्यावर यशस्वीरित्या पार पाडणार आहोत. त्या अनुषंगाने मोगरा नाल्यात वाहून येणारे फ्लोटिंग मटेरियल काढून त्या पाण्यावर ऑर्गेनिक प्रक्रिया करून त्यातील गाळ आणि शुध्द पाणी हे १० मिनिटांत वेगळे करून त्यातील गाळ बाजूला काढून शुध्द पाणी समुद्रात सोडणार. जेणेकरून समुद्री प्रदूषण १०० टक्के संपवता येईल."
 
 
योगीराज दाभाडकर, प्रभाग समिती अध्यक्ष, के- पश्चिम
 
@@AUTHORINFO_V1@@