जिल्ह्यात १५ टँकरद्वारे २५ गावांना पिण्याचे पाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : उन्हाच्या वाढत्या तडाख्याप्रमाणेच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यासाठी टँकरची मागणीही वाढली असून प्रशासनाने आणखी पाच गावांसाठी नव्याने ३ टँकरला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत २५ गावांची तहान १५ टँकरद्वारे भागवली जात आहे.
 
गत पावसाळ्यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होऊनही आणि धरणेही काठोकाठ भरूनदेखील जिल्ह्यात फेब्रुवारीतच पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले. मार्चमध्ये तर पाण्याच्या टँकरसाठी अधिक मागणीही होऊ लागली आहे. प्रशासनाकडूनही जानेवारी, फेब्रुवारीत प्राप्त झालेल्या काही प्रस्तावांना प्रलंबित ठेवत ’जलयुक्त शिवार अभियाना’ची यशस्विता दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
 
त्यामुळे टँकरच्या प्राप्त प्रस्तावास चार दिवसांत निकाली काढण्याच्या आदेशाला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याची टीकाही झाली. आता त्यातून धडा घेत जिल्हा प्रशासनाकडून टँकरचे प्रस्ताव प्राप्त होताच त्यांना मंजुरी दिली जात आहे. त्यानुसार सोमवारी येवल्यातील ४ गावांसाठी २ 0आणि सिन्नरला एका गावासाठी एक असे तीन टँकर प्रशासनाने मंजूर केले आहेत. यापूर्वी जिल्ह्यात १२ टँकर सुरू असून त्यात बागलाणमध्ये ७ टँकरद्वारे १२ गावांची तहान भागवली जात आहे. येवल्यात ७ गावांसाठी ४ टँकर सुरू होते. त्यात दोन टँकरची भर पडली. मालेगावला एका गावासाठी एक टँकर सुरू आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@