राज्यसभेच्या निवृत्त सभासदांना सभागृहाचा निरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |


नवी दिल्ली : राज्यसभेच्या निवृत्त होणाऱ्या सभासदांना सभागृहाकडून निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व सभासदांना निरोप आणि  शुभेच्छा दिल्या. राज्यसभेमध्ये सर्व निवृत्त सभासदांच्या सन्मानार्थ भाषण देऊन मोदींनी यासर्वांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यात देशहितासाठी त्यांच्याकडे कसल्याही कल्पना असतील त्यासाठी पंतप्रधान कार्यालय त्यांना नेहमी साहाय्य करेल, असे आश्वासन देखील त्यांनी आज दिले.

राज्यसभेतील ५८ सदस्यांचा कार्यकाळ आज पूर्ण होत आहे. त्यानिमित्त राज्यसभेत आज त्यांच्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सदस्यांच्या आजपर्यंतच्या कार्याचे कौतुक केले. काही सभासदांच्या कार्यांची आठवण करून देत देशहितासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. भविष्यात देखील या सर्व सभासदांनी देशहितासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांच्यासाठी पंतप्रधान कार्यालाचे दरवाजे नेहमी खुले राहतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मोदींच्या भाषणानंतर सभागृहातील इतर सभासदांनी देखिल सर्व निवृत्त सभासदांना शुभेच्छा तसेच निरोप दिला. सर्व सभासदांनी थोडावेळ निवृत्त सभासदांच्या कार्यांवर भाष्य करत, त्यांचे कार्याचे कौतुक केले तसेच भविष्यात देखील त्यांच्या सर्व कार्याला आपण सहकार्य करू, असे आश्वासन देखील यावेळी दिले. 

@@AUTHORINFO_V1@@