उ.कोरिया आणि चीन पुन्हा 'जवळ'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |


बीजिंग : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याने चीनला दिलेल्या 'सरप्राईज व्हिजीट'नंतर चीन आणि उत्तर कोरिया पुन्हा एकदा जवळ येत असल्याचे दिसत आहे. चीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर यापुढे चीन आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंधांमध्ये सातत्याने सुधारण्यात करण्यात येतील, अशी कबुलीचीनी राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे. तर उत्तर कोरिया देखील यापुढे चीनबरोबर असलेले आपले मैत्रीपूर्ण संबंध आणखी दृढ करण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन किम जोंग उन याने दिले आहे. त्यामुळे पूर्वेकडे निर्माण होत असलेल्या या नव्या समीकरणाने अमेरिकेसह सर्व युरोपीय देश बुचकळ्यात पडले आहेत.

आज सकाळी किमने बीजिंग येथे जाऊन शी जिनपिंग यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. परंतु यातील मुद्दे मात्र कोणाकडूनही जाहीर करण्यात आले नाही. उत्तर कोरियाकडून मात्र ही एक अनौपचारिक भेट असल्याचे जाहीर करण्यात आले. दोन्ही देश एकमेकांचे शेजारी असून दोघांमध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत, याच या भेटी मागील मुख्य उद्देश असल्याचेही उत्तर कोरियाने म्हटले आहे. परंतु या भेटीची चर्चा मात्र सध्या जगभर सुरु आहे.
 


@@AUTHORINFO_V1@@