आयएसएसएफ स्पर्धेत भारताचा आणखीन एक 'सुवर्णवेध'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

चीनला पराभूत करून आणखीन एका सुवर्णपदकाची कमाई



सिडनी :
ऑस्ट्रेलियाच्या राजधानी सिडनीमध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल शुटींग स्पोर्ट फेडरेशनच्या २५ मी अंतराच्या महिला पिस्तुल गटामध्ये भारताला आणखीन एक सुवर्णपदक मिळाले आहे. भारताची १६ वर्षीय खेळाडू मुस्कान हिने महिला गटातील अंतिम सामन्यामध्ये चीनच्या किन सिहांग हिचा पराभव करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. मुस्कान या विजयामुळे भारताच्या खात्यात एकूण नऊ सुवर्णपदके जमा झाली आहेत.
सामन्याच्या सुरुवातीपासून मुस्कानने अत्यंत उत्तम खेळी करत सामन्यात एकूण ३५ गुणांची कमाई केली. तसेच चीनच्या सिहांग हिने देखील आपल्या चमकदार खेळीचे प्रदर्शन करत सामन्यात एकूण ३४ गुणांची कमाई केली. यामुळे मुस्कानने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले तर सिहांग हिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तसेच थायलंडच्या के.हिरनफोम हिला रौप्य पदकाचा मान मिळाला आहे.




गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या या स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंनी अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यात एकूण २२ पदक जमा झाली आहेत. ज्यामध्ये ९ सुवर्ण, ५ रौप्य आणि ८ कांस्यपदकांचा समावेश आहे. या पदकांसह भारत सध्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून २५ पदकांसह चीन पहिल्या क्रमांकावर आहे.
@@AUTHORINFO_V1@@