शोभा यात्रेवरील हल्ल्याचा ममतांना जाब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |




नवी दिल्ली : प.बंगालमधील रामनवमी निमित्त निघालेल्या शोभायात्रेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांच्याकडे जाब विचारला आहे. शोभायात्रेवर झालेल्या हल्ल्याचा सविस्तर अहवाल प.बंगाल सरकारने तातडीने सादर करावा. तसेच राज्यातील हिंसाचार रोखण्यासाठी सरकार काय उपाय करत आहे, याची देखील माहिती प.बंगाल सरकारने तातडीने द्यावी, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

गेल्या रविवारी राम नवमीनिमित्त प.बंगालमध्ये निघालेल्या शोभायात्रांवर काही समाजकंटकांनी हल्ला केला होता. या दरम्यान झालेल्या हिंसाचारामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. काल रात्री देखील दुलागड येथे एक दंगल भडकली होती. यामध्ये एकाला आपला प्राण गमवावा लागला. तसेच काही पोलीस देखील गंभीररित्या जखमी झाले. यावर केंद्रीय गृह मंत्रालयाने प.बंगालमध्ये निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले. तसेच हिंसाचारसाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. 

दरम्यान केंद्र सरकार बरोबर भाजप नेत्यांनी देखील हा हिंसाचारावरून ममता सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी ममता यांना लक्ष करत, 'माँँ, माटी आणि मानूस अशा घोषणा देणाऱ्या ममता बॅनर्जी सध्या तीन दिवसांपासून राज्यात भडकलेला हिंसाचार शांत बसून पाहत आहेत. कारण या हिंसाचारात मारणारे लोक आपले आहेत, असे बहुतेक त्यांना  वाटतच नाही, अशी टीका सुप्रियो यांनी केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@