सामान्यातील असामान्यत्वाला वाव देणारे शिक्षण असावे : डॉ. ताकवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्वाध्याय, सहाध्याय आणि निर्मितीवर भर असून शिक्षण आणि सामाज विकास यांच्यात एकात्मिक संबंध जोडला आहे. त्यातील विकासाचा मार्ग शिक्षणास दाखवावा लागणार आहे. सामान्यातील असामान्यत्वाला वाव देणारे शिक्षण असावे, असे प्रतिपादन डॉ. राम ताकवले यांनी केले.
 
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या २४ व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी डॉ. ताकवले यांना सन्माननीय डी.लिट. देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. चांदेकर होते. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन, कुलसचिव दिनेश बोंडे, परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटूळे तसेच विद्यापीठाचे व्यवस्थापक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
 
 
चांदेकर म्हणाले, ’’तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी आवश्यक मनोवृत्ती तयार करण्यात विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात नव्या तंत्रज्ञानाचा वापर, विकास आणि त्याचे फायदे यांना स्थान देणे आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रवृत्त करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कुलगुरू डॉ. वायुनंदन यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर केला. विद्यापीठाने ई-गव्हर्नन्सवर भर दिला असल्याचे नमूद करून पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याची सुविधा चालू वर्षापासून उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
समारंभात एक लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. ताकवले यांना डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. यशस्वी स्नातकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक व पदवी प्रदान करण्यात आली. ३१ अभ्यासकांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली, तर ४३ स्नातकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
 
वसुंधरा इगवेंना सुवर्णपदक
 
मुंगसरे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या वसुंधरा ज्ञानोबा इगवे यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून वृत्तपत्रविद्या पदवी अभ्यासक्रमासाठी ब्लू बर्ड लि.पुणे पुरस्कृत सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला. एम. ए, बी.एड, डी. एड अशी पदवी धारण केल्यानंतर अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमाच्या आवडीमुळे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. घरच्या जबाबदार्‍या सांभाळीत परिश्रमपूर्वक यश मिळविणार्‍या इगवे यांनी तरुण विद्यार्थ्यांसमोर प्रेरक उदाहरण प्रस्तुत केले आहे. २०१४ साली मुलासह एचपीटी महाविद्यालय येथे वृत्तपत्रविद्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी पदवी परिक्षेत ७३ टक्के गुण मिळवित यश संपादन केले. अभ्यासाचा आनंद घेतल्याने यश मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
 
@@AUTHORINFO_V1@@